मुंबई,दि.21 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही म्हत्वाची माहिती दिली. 40 वर्ष भाजपमध्ये काम करून भाजपला बळ दिलं. त्यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला सांगितलं. शुक्रवारी २ वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पञकार परिषदेत दिली.
एकनाथ खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल.आणि भाजपमध्ये होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत.असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
खडसेंना काय द्यायचे याची चर्चा झालेली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पक्षात येत असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
लवकरच त्यांची पक्ष प्रवेशा नंतर मोठा पदावर वर्णी लागेल अशी चर्चा वर्तृळात रंगली आहे