Home ताज्या बातम्या उन्नती सोशल फाउंडेशन कडुन रोज आयकॅान सोसायटी मधील २०० महिलांना कोरोनायोद्धा पुरस्काराने...

उन्नती सोशल फाउंडेशन कडुन रोज आयकॅान सोसायटी मधील २०० महिलांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित

87
0

पिंपळे सौदागर,दि.20 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोरोना महामारीच्या काळात समाजातील अनेक घटकांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवराणाचा करोणायोद्धा पुरस्कार देऊन पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व करोना काळात गरजूंना रोज जेवणाचे टिफिन पुरविणारे रवि मुंढे, भारत लोहीया,मोहित अग्रवाल, उषा अग्रवाल, दिक्शा केजरीवाल, पाटील मॅडम ,विजया काटे,पंकज देशमुख, संतोष कवडे, प्रसाद पाखरे ,ललित केरीवाल व अभिजित धारूनकार यांना कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

कोरोना महामारी सुरु झाली आणि होत्याचे नव्हते झाले . अनेक कामगार अन्ना वाचून भुके राहू लागले जेंव्हा रोज आयकाॅन सोसायटी मधील महिलांना समजले तेंव्हा सोसायटीतील २०० महीलांनी ३ महिन्यात २२ हजार जेवनाचे टिफीन पुरवले. रहाटणी,पिंपळे सौदागर भागातील जेवढे गरजवंत होते त्यांच्यापर्यँत जेवणाचे डबे पोहचविले
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या कि, जे नागरिक स्वतःच्या जीवाची परवा न करता व कुटुंबाची जवाबदारी सांभाळून दुसऱ्यासाठी मदत करतात ,अहोरात्र झटतात त्यांना सन्मानित करून प्रोत्साहन देणे हे आपले करत्वे आहे. म्हणून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आम्ही अशा नागरिकांचा सन्मान करणे उच्चीत समजले आहे.
त्यावेळी रोज आयकॅान सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे व सोसायटीतील सर्व सभासदांन तर्फे उन्नती फाउंडेशन व सौ कुंदा संजय भिसे यांचे आभार मानले.

Previous articleमानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांनी दिल्या घटस्थापनेच्या शुभेच्छा..
Next articleभाजपचे नेते एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश ठरला; शुक्रवारी पक्ष प्रवेश -जंयत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 3 =