Home ताज्या बातम्या भाजपा की राष्र्टवादी ? नक्की चालय काय ?

भाजपा की राष्र्टवादी ? नक्की चालय काय ?

254
0

पिंपरी,दि.23 ऑगस्ट 2021(संपादकीय):-पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये स्थायी समितीवर अँटी करप्शन ची रेड पडली आणि भाजपा नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे सह चार पालिका कर्मचारी सापडले घडलेला प्रकार हा निंदनीय असून यावर संपूर्ण शहरभर चर्चेला उधाण आले आहे भारतीय जनता पार्टी विरोधात विरोधकांना जणू एक आंदोलनासाठी मुद्दा मिळाला त्यामुळे अनेक पक्षांच्या वतीने भाजपा विरोधात तोंडसुख घेत मोर्चे निघाले मात्र प्रत्येक मोर्चाचा नेतृत्व करणारे नेतृत्व दबक्या आवाजात का होईना माणूस चुकीचा सापडला अशी चर्चा करू लागला आहे, म्हणजेच सत्ताधारी ते विरोधक यांच्या म्हणण्यानुसार याआधी असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत होते असे चित्र आणि चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.काही संघटनेनेही 2017 पासून भाजपची सत्ता आल्यापासून सर्व स्थायी सदस्य व स्थायी समिती अध्यक्षांची व त्यांच्या नातेवाईकांची संपत्तीची चौकशी करावी ही मागणी जोर धरू लागली आहे.मात्र हे झालेल्या दिवसापासून हा संपूर्ण प्रकार एकंदरीत शहरात नाक्यावर, वाड्यावर,वस्तीवर,पान टपऱ्यांवर चर्चेचा विषय बनला आहे. काही विरोधक मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहराचा राजकारण आपल्या हाती यावं व शहरावर किंगमेकर बनू पाहणाऱ्यांनी व त्यांच्या चेले चपाट्यांनी गाववाले सर्व पक्ष सोडून अ‍ॅड. नितीन लांडगे साठी एकत्र आले आहेत अशी मोठी अफवा शहरभर पसरवली आहे. या घटनेचा फायदा येणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत घेता यावा स्थानिक गाववाला व बाहेरचा असा संभ्रम निर्माण करून गाववाल्यांना बदनाम करायचं व त्याचा फायदा निवडणुकीसाठी उचलायचा व स्थानिक गाववाला उमेदवारांना पराभूत करायचं आणि पिंपरी-चिंचवड शहरावर राज्य करायचं सत्ता भाजपाची असो की राष्ट्रवादीची मात्र फायदा कोणाला झाला नाही पाहिजे यासाठी शहरातील ताई आणि भाई यांनी कंबर कसली आहे विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली या प्रकारात ताई व भाई बरोबर काही नामांकित शहरातील पत्रकार व ठेकेदार पत्रकार सुद्धा आहेत अद्याप त्यांची नावे अजून समजलेले नाहीत पिंपरी चिंचवड शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे त्यात मात्र भाई आणि ताई यांनी सदर प्रकार घडवून आणल्याची चर्चा जोर धरत आहे. भाऊ, दादा, शेठ, अण्णा, तात्या, काका ही भावकी गावकीचा राजकारणात अडकलेली आहेत त्यामुळे त्यांना पराभूत करण्याची ही सुवर्णसंधी आहे अशी अफवा पसरवत स्थानिक व नोंद झालेल्या मतदारांच्या मतात परिवर्तन करुन पिंपरी-चिंचवड मनपा आणि शहर व येणारी विधानसभा यासाठी चाललेला हा राजकीय खटाटोप आहे.

विरोधकांमध्ये यापूर्वीही जो-तो सर्व गावकी भावकी विसरून वार्डात कामे करतात फिरतात गाववाला आहे म्हणून गाववाल्यांची नाहीतर सर्वांची कामे करतात मात्र त्यांना निवडणुकीत पराभव करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे

भाजपाला पिंपरी-चिंचवड मनपात सत्तेचा फायदा नाही विरोधकांना फायदा नाही मग फायदा कोणाला? लाॅबिंग तोडण्यासाठी घर का भेदी लंका ढाए असाही प्रकार असू शकतो त्याचा फायदा सर्वानी नेतृत्व अमान्य केलेल्या कोण्या भाईला होणार असणार त्यामुळे ताई ला सोबत घेऊन कार्यक्रम थेट लावला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा जोर धरत आहे. अनेक जण पक्षांतर करतील भाजपा किंवा राष्ट्रवादीत मात्र नवीन पिढी षडयंञकारी उमेदवारांना धडा शिकवेल यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या घटनेचा भरपूर फरक पडेल व भाजपाला जास्तीचे मेहनत घ्यावी लागेल तर राष्ट्रवादीला चा चापसुन पक्षांतर घडून आणण्यापेक्षा नवतरुण उमेदवारांना संधी देऊन नवीन चेहर्‍यांना निवडून आणावे लागेल तरच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेते परिवर्तन घडेल अन्यथा पुन्हा सत्तेत भाजपा बसेल.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश
Next articleनाशिक मध्ये गुन्हा दाखल झाल्याने मंञी नारायण राणेंना पोलिसांकडुन अटक तर त्यांच्या जीवाला धोका असल्याचे प्रसाद लाड यांच वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × one =