Home ताज्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील...

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

82
0

नाशिक,दि.21ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वे वंशज किरणराजे भोसले यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. याबाबत आज ना रामदास आठवले यांनी जाहीर घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम आणि त्यांच्या घराण्यात वंशावळी नुसार छात्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वंशज किरणराजे भोसले आहेत अशी माहिती स्वतः किरणराजे भोसले यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी अत्यंत योग्य भूमिका घेऊन पाठिंबा दिला. सर्वप्रथम ना.रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. सर्व जाती धर्मासाठी रिपब्लिकन पक्षाची भुमीका समतेचेच्या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेणारी असल्याने आपण ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत असल्याचे किरणराजे भोसले यांनी जाहीर केले.

Previous article‘कोण आले रे!कोण आले!, भाजपचे चोर आले” टर उडवत महापालिका प्रवेशद्वारावर वंचितचे अंदोलन
Next articleभाजपा की राष्र्टवादी ? नक्की चालय काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × three =