Home ताज्या बातम्या बोगस पञकारांचा सुळसुळाट ; पञकारीतेचे शिक्षण घेणार्‍या पञकारांन समोर काम करताना ठरती...

बोगस पञकारांचा सुळसुळाट ; पञकारीतेचे शिक्षण घेणार्‍या पञकारांन समोर काम करताना ठरती मोठी अडचण.

288
0

पिंपरी-चिंचवड,दि.२६ जानेवारी २०२२(प्रजेचा विकास संपादकीय- विकास कडलक):-पत्रकारितेच्या शिक्षणासाठी उघडलेल्या सर्व संस्था,डिप्लोमा,डिग्री सर्टिफिकेट कोर्स हे सर्व बंद करा. कारण कोणी उठतय माईक आणि आयकार्ड घेतोय आणि स्वतःला पत्रकार म्हणून मार्केटमध्ये फिरतोय,आणि या सर्व वृत्तीमुळे पत्रकार मात्र बदनाम होतोय पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता करणारे कमी आणि ब्लॅकमेल, कॉपी-पेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.गुन्हेगारी क्षेत्रातील किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक स्वतःच्या नावाने वृत्तपञाची नोदंणी करतात. नाही झाले तर बायको,मुलगा,भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावाने रजिस्टर करतात आणि मार्केटमध्ये संपादक पत्रकार म्हणून लोकांना ब्लॅक मेल करतात किंवा दहशत करतात अशा पत्रकारांना प्रशासनाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.पञकार परिषदेत किंवा वृत्तांकन करताना. प्रश्‍न विचारतोय का? सल्ला देतोय याचाही भान राहत नाही मात्र यावर सामाजिक कार्यकर्ते नेते हे मात्र सर्वच पत्रकारांना टारगेट करतात.बोगस पञकारांना खरे तर थारा दिला नाही पाहिजे.गैरसमज मनात धरून संपूर्ण पत्रकार जातीला शिव्या देतात.काही पञकारांनी तर खोटी कागदे बनवुन तयार ठेवली आहेत,आणि लोकांना सांगतात जुना पञकार आहे, सध्याच्या परिस्थितीत कोवीड काळात तर अनेक पत्रकार वाढले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत गुन्हेगार आहेत का पत्रकार आहेत हेच समजत नाही मात्र सरकारी कार्यालय आणि राजकीय कार्यालयात ठामपणे पत्रकार असल्याच्या वावर करतात. त्यामुळे बातम्या खर्‍या-खोट्या ओळखणं खूप अवघड होतं आणि पत्रकारिता क्षेत्रात शैक्षणिक अभ्यासक्रमात शिक्षण घेऊन पत्रकारिता करणाऱ्या समोर मात्र अडचणी उभ्या राहतात यावर मोठमोठे दैनिक,साप्ताहिक,टि.व्हि चॅनल वाले मूग गिळून आहेत मात्र त्यांच्याच दैनिक साप्ताहिक का मधील जाहिरात प्रतिनिधींना मोठमोठे टारगेट दिलेले असतात. त्याच्यावर याचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो मोठमोठ्या जाहिराती सुरुवातीला मिळत होत्या मात्र आता या बोगस पत्रकारांना मुळे कमी झाले आहेत आणि मोठमोठे चैनल वृत्तपत्र दैनिक,साप्ताहिक,टि.व्हि चॅनल वाले हे मात्र त्या जाहिरात प्रतिनिधींना टार्गेट पूर्ण होत नाही म्हणून काढून टाकतात अशा अनेक गोष्टींना पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या पत्रकारांसमोर अनेक मोठमोठ्या अडचणी उभे राहतात संपूर्ण बोगस पत्रकारांची एक जमात तयार झाली आहे ती पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांसमोर अरेरावीची भाषा करून दमदाटी धाकदपटशा करण्याचा प्रयत्नही करतात त्यामुळे अनेकदा या पत्रकारांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र याचा खूप मोठा परिणाम हा समाजावर हि घडत असतो याकडे पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन या स्थानिक संस्थेच्या प्रशासन याकडे लक्ष देईल का यावर ठोस पावले उचलतील का जर उचलू शकत नसतील तर माझे सरकारला आव्हान आहे आपण सुरू केलेल्या पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व संस्था,शाळा,काॅलेज,डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स या बंद कराव्यात पोलीस आयुक्तालय असेल जिल्हा आयुक्तालय असेल या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सर्व क्षेत्रातील प्रशासनाने त्यांच्या आवारात येणाऱ्या पत्रकारांची चौकशी केली पाहिजे त्यांचे शिक्षण आणि ते पत्रकारितेच्या शिक्षण पारंगत आहेत का या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत अन्यथा उद्या अजून कोणी उठेल आणि स्वतःला पत्रकार म्हणून कुणाला ब्लॅकमेल करेल कुणाकडे खंडणी मागेल मात्र या सर्व प्रकारांमध्ये पत्रकार जात ही बदनामी होत राहील मोठमोठे दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही चॅनल वाले यांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ठोस पावले उचलण्याची गरज आहे.अनेक लोक संभ्रमात पडतात पत्रकाराच्या विरोधात बोलायचं कसं पण मात्र बोगस पत्रकार आहे की नाही हे आपण तपासले पाहिजे आपण आपल्या मुलांना पत्रकारिता क्षेत्रात शिक्षणासाठी पाठवतात त्यावर अनेक बोगस पत्रकार समाजामध्ये फिरत असतात शे- पाचशे रुपयांसाठी स्वतःला पत्रकार दाखवतात त्यामुळे समाजाचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत आहे पत्रकारांना तुच्छ समजण्यास लोकांची सुरुवात व्हायला लागलेली आहे त्यामुळे यावर ठोस पावले उचलण्याची काळाची गरज आहे. काही काही पत्रकार खोटे दाखले खोटे डॉक्युमेंट बनवून अनेक कित्येक वर्षापासून स्वतःला मोठा पत्रकार आहे असे भासवत आहेत तर काहीनी बोगस रित्या अधिस्वीकृती कार्डधारक ही आहेत याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा तो दिवस दूर नाही कि पत्रकारांनाही स्वतःचा न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागेल पत्रकारिता क्षेत्रात चाणाक्ष निपुण राहावं लागतं मात्र काही बोगस पत्रकारांमुळे समाजामध्ये काम व चर्चा करत असताना राजकीय पुढारी सहज पत्रकार म्हणून डावलून टाकतात त्यामुळे पत्रकारांची किंमत कमी होत चालली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक स्वताच वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करत आहेत शहरात खूप पत्रकार झाले आहेत गावात खूप पत्रकार झाले आहेत.शहरात,तालुक्यात,जिल्हात खूप पत्रकार झाले आहेत नक्की कुणाकुणाला बोलवायचं असे अनेक प्रश्न सामाजिक राजकीय नेते विचारत आहेत अचानक एवढे पत्रकार आले कुठून असाही प्रश्न निर्माण होतो मात्र पत्रकारांची छबी याच्यात कुठेतरी बदनाम होत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सरकारने यावर निर्बंध घातले पाहिजेत वेळीच या बोगस पत्रकारांना जरब बसवली पाहिजे अन्यथा हा क्राईम क्षेञातही पत्रकारितेच्या नावाने मोठमोठे क्राईम ही केले जाऊ शकतात. याची खबरदारी सर्व पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांनी मोठमोठ्या दैनिक, साप्ताहिक व टीव्ही चॅनल्स वाल्यांनी खबरदारी घेतली.पाहिजे राजकीय,सामाजिक नेत्यांनीही पत्रकारांना बोलवताना त्या पत्रकाराची माहिती घेतली पाहिजे अन्यथा सोशल मीडिया वरती पडणाऱ्या पोस्ट ह्या त्यांच्या अडचणीत भर पाडणार आहे.बोगस पञकार दहशती साठी काही ही करु शकतात. अनेक गोष्टी लक्षात घेऊन आपण पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडे लक्ष दिले पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे.पञकार हा टिकला पाहिजे जगला पाहिजे ह्या बोगस पञकारांवर करडी नजर ठेवुन यांना बाहेर काढले पाहिजे,त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.

पत्रकारितेचे आकर्षण अनेकांना असते. पत्रकारिते भोवती असणारे ग्लॅमर ,त्यांना मिळणारा मानसन्मान व विशेष वागणूक यांचे आकर्षण असणे गैर नाही. ख-या अर्थाने पत्रकारिता करणा-यास तो मान मिळणे हा त्याचा हक्कच आहे.पत्रकारिता म्हणजे निव्वळ बातमी देणे एवढे मर्यादित नाही. समाजातील समस्या व नागरी समस्यांना वाचा फोडणे,त्यावर भाष्य करणे व उपाय योजना सुचविणे हा देखील पत्रकारितेचाच एक भाग आहे.हे आताचे आणि जुने बहुतांश पत्रकार विसरतात.बातमीत बातमी असावी, मी नसावा एवढेच लक्षात घेतले जाते. झालेली घटना किंवा मुलाखत वा पत्रकार परिषद , सभा- संमेलनं यांची बातमी देणं हीच पत्रकारिता असा बहुतांश पत्रकार व बातमीदारांचा समज आहे.पत्रकार व पोस्टमन यातला फरक ओळखता आला पाहिजे. पोस्टमन जसा आलेले पत्र पोहच करतो तसेच जर आपण प्रेस नोट किंवा बातमी आपल्या वृत्तपत्रात पाठवली तर वेगळेपण कसे जाणवणार. आज एक राईटर बातमी टाईप करतो व बाकीचे ती आपापल्या दैनिकांत साप्ताहिकात पोर्टलवर काॅपी पेस्ट करतात. एकच टिपणी व मथळा,एकच मजकूर अनेक दैनिकांत साप्ताहिकात पोर्टलवर एकाच वेळी प्रकाशित होतो. एकच व्यक्ती अनेक दैनिकांचे,साप्ताहिकांचे व न्युज पोर्टल युट्युब चॅनलचे प्रतिनिधित्व करते.आधिच्या वेळी एका चॅनलवर साप्ताहिकात, दैनिकात काम करत असलेल्या पत्रकारास दुस-या दैनिकात,साप्ताहिकात स्थान नसायचे. किंवा त्याला आधीच्या दैनिकाचा,साप्ताहिकाचा राजिनामा तरी द्यावा लागत असे.प्रत्येक दैनिकात एकच घटना वा बातमीचा मथळा व मजकूर वेग वेगळा असायचा.म्हणूनच प्रत्येक पत्रकाराचा वेगवेळा स्वतंत्र ठसा उमटायचा.आता सर्व बातम्या एकसारख्या असतात. आणि त्यावेळी एका दैनिकात छापून आलेली बातमी दुस-या दैनिकात दुस-या दिवशी छापण्याचे टाळले जात असे.अनेकांनी दैनिकांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी संपादकांचा एक आग्रह असे की दर आठवड्याला एक वार्तापत्र हवे.हे वार्तापत्र म्हणजे त्या आठवड्यातील महत्वपूर्ण घटनेचे विश्लेषण करणारे; त्या पत्रकाराचे वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन. त्यात वैशिष्ट्यपूर्ण माहिती असायची.एक प्रकारचे संपादकीय. आणि आठवड्यातील एक दिवस लेखनासाठी स्टोरी साठी राखीव ठेवला जात असे. या शिवाय स्वतंत्र लेख असे.सामाजीक,राजकीय,सर्वच क्षेञातील व्यक्ती आता माञ बोगस पञकारांमुळे वैतागुन स्वताः सोशल मिडियावर लिखान लेखन करुन वायरल करु लागलेत.आतातर पत्रकार कम जाहिरात एजन्टचे पीक अमाप आले आहे.पाकिट पत्रकारिता व पेडन्यूजला अप्रत्यक्षरित्या मान्यताच मिळाली आहे.याला अधिकृत पञकार व मालकच जबाबदार आहेत.कारण ते बोगस पञकारांन कडे दुर्लक्ष करतात.आजच्या लेखाचा मुळ उद्देश बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि पञकारीतेचे शिक्षण घेऊन पञकारीता करणार्‍या नां होणारा ञास हा आहे. मुळात पत्रकार नसताना व पत्रकारितेचा गंध नसलेले अनेक झोळी छाप लोक पत्रकारितेत हैदोस घालत आहेत. एखाद्या दैनिक वा साप्ताहिकाचे व चॅनलचे ओळखपत्र मिळवायचे व लोकांना ब्लॅकमेल करून लूटमार करीत रहायचे हा धंदा सुरू झाला आहे.एखादा बकरा पकडायचा व सुरू होयाचे असले कारणामे बाहेर चर्चेत आहेत, पत्रकारांचे कार्ड,ओळखपत्र दाखवुन पैश्यांची मागणी करतात. त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर तक्रार करून ञास देऊन. गुन्हेगार असल्यासारखे टोळकी करुन दहशत पसरवतात. एका टोळीने दुकानदार व महिला बचत गटांना,चक्क मोठमोठ्या पोलिस आधिकार्‍यांना, प्रशासनात काम करणार्‍या आधिकारी ते कर्मचार्‍यांना व टेकेदारांना लक्ष्य करून ब्लॅकमेल करण्याचा सपाटा लावला आहे.त्यांच्या विरूद्ध कोणी गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवित नाही.कारण ते खबरी म्हणून वावरतात व दहशत दाखवतात.तरी त्यांच्या विरोधात काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.असे बोगस पञकारांचे शिक्षण हि चौथी ते दहावी पर्यंत आहे.बोगस पञकार हे स्वताच्या स्वार्थासाठी व दहशत करण्यासाठी स्वयंम घोषीत पञकार झाले आहेत.अनेक जिल्हास्तरीय दैनिकांचे व साप्ताहिकांचे संपादक ब-याच वेळा पैसे घेऊन त्यांच्या चॅनलचे व वृत्तपञाचे वार्ताहर नेमतात व त्यांना पत्रकाराचे ओळखपत्र देतात. काही संपादक तर नियमित जाहिरात देणाऱ्यांना, किंवा व्यापा-यांस,टेकेदारास ओळखपत्र देतात. अर्थात या ओळखपत्राचा उपयोग बातमी देण्यासाठी कधीच होत नाही.आपल्या वाहनांवर प्रेसचे स्टिकर वा बोर्ड लावुन फिरायचे.त्यामुळे टोल,जकात चुकविता येते. अवैध मार्गाने माल आणला जातो.नाकाबंदीच्या काळात प्रेस असल्याने सखोल चौकशी व तपासणी पासून बचाव होतो तर टेका मिळवण्यासाठी किंवा दबाव टाकुन विविध मार्गाने पैसे उकळण्यासाठी होतो. वर सांगितल्या प्रमाणे हप्ते,खंडणी व ब्लॅक मेलिंगसाठी या ओळख पत्रांचा हमखास वापर केला जातो.काही बोगस पञकार दहशत करुन फसवणुक करुन मोठमोठे टेके चालवत आहेत.आधिकारी पण वाद नको किंवा कुठे अडकायला नको म्हणुन टेका देतात.अशा भामट्या व बोगस पत्रकारांमुळे खरे पत्रकार बदनाम होतात व त्यांनाही त्याच नजरेने पाहिले जाते. या बोगस पत्रकारांचे जनक खरे पत्रकारच असतात जे मोठ्या दैनिकांत काम करतात,हे खेदाने नमुद करावे लागत आहे.कारण कोणत्याही संपादकाने त्यांना ओळखपत्र दिलेच नाही तर या बांडगुळांना संधी मिळणार नाही.पण जाहिरात व एक रकमी पैश्याच्या मोहाला बळी पडून नोंदणीकृत वृत्तपञाचे संपादकच त्यांना ओळखपत्र बहाल करीत असतात.काही पत्रकार तर निव्वळ वरील लाभांसाठी व खुनससाठी दहशती साठीच वृत्तपञाची नोंदणी करतात. किंवा एखादे बंद पडलेले वृत्तपञ “मुंह मांगे दामसे” विकत घेतात. आणि आपल्या धंद्याच्या संरक्षणासाठी वापरतात. पत्रकारितेस बोगस पत्रकारांची लागलेली ही वाळवी नष्ट करण्यासाठी आता मोठ मोठ्या दैनिकांनी,साप्ताहिकांनी,टि.व्हि चॅनलनी, मालक,चालक व अधिकृत पत्रकारांनी कंबर कसली पाहिजे. जिल्हा माहिती खात्यानेही वृत्तपञ व चॅनलवर काम करणार्‍यांची यादी,त्यांचे संपादक व अधिकृत प्रतिनिधी यांची यादी जाहिर केली पाहिजे व ती पोलीस स्टेशन,महापालिका,नगरपालिका व शासकिय कार्यालयात व शासकीय पोर्टलवर प्रसिद्ध केली पाहिजे.शासकीय सर्व कार्यालय,तसेच महापालिकेतही अधिकृत पत्रकारांनाच प्रवेश दिला पाहिजे व त्यावर अंकुश ठेवला पाहिजे.नागरीकांनीही निर्भीडपणे ओळखपत्राची मागणी करून तो खरंच पत्रकार आहे का ? याची खात्री करून घ्यावी.बोगस पत्रकारां विरूद्ध खंडणीचे गुन्हे नोंदवावेत.पत्रकारांचे काम बातमी देणे आहे, व्यापा-यांच्या गाड्या अडवुन बॅकमेलिंग करणे वा एफआयआर दाखल करणे नव्हे !! हे ठणकाऊन सांगितले पाहिजे.बोगस पत्रकारांना वठणीवर आणण्यासाठी अनेक कायदे आहेत. त्यांची वैधता ठरवणे Press Council चे काम आहे.जनते प्रमाणेच ख-या अधिकृत पत्रकारांनीही याकामी पुढाकार घेऊन हे नासलेले कांदे फेकून द्यावेत व पत्रकारितेस बदनाम करणा-यांना आपल्यातून हुसकाऊन लावावे.जिल्ह्यात बोगस पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रशासन यांना अनेक सामाजीक संघटनेने या आधीही निवेदन दिले आहेत.शासनाने लॉकडाऊन काळात पत्रकारांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला आहे . याच सवलतीचा गैरफायदा घेऊन ठेकदार,सामाजीक,राजकीय लोकांनी व गुन्हेगारी वृत्तीच्या बोगस व अनाधिकृत संपादकांनी बंद पडलेल्या वृत्तपत्रांच्या ओळखपत्रांची पुढार्‍यांना सामाजीक कार्यकर्त्यांना तसेच अवैध धंदेवाल्यांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना सर्रास विक्री ” केली आहे . या अवैध बोगस पत्रकारांचा प्रशासनातील अधिकारी , पोलिस आदिंना मोठा त्रास होत आहे . या बोगस पत्रकारांमुळे माध्यमातील खऱ्या अधिकृत पत्रकारांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे तेंव्हा सरकारची मान्यता नसलेल्या कोणत्याही माध्यमांसह अशा बोगस आणि अनाधिकृत संपादक , पत्रकारांवर फसवणूक व साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी.शहर व संपूर्ण जिल्ह्यात बोगस पञकार व अनाधिकृत संपादक यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे.अशा बोगस पत्रकारांचा संपादकांचा प्रशासनातील अधिकारी , पोलिस अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,आणि पञकारीतेचे शिक्षण घेऊन पञकारीता करणारे खऱ्या अधिकृत पञकार आणि संपादक यांना विनाकारण त्रास होत आहे . हे बोगस संपादक , पत्रकार अधिकार्‍यांना ब्लॅकमेल सुध्दा करीत आहेत . बोगस पत्रकार ओळखपत्र गळ्यात लटकवून अवैधरित्या बाहेर मोकाटफिरत आहेत . प्रेस एक ॲक्ट नुसार जे वृत्तपत्र छपाई व प्रकाशन बंद आहे . त्याचे डिक्लेरेशन कायद्यानुसार आपोआप रद्द होते त्यांना पुन्हा डी . एम . मार्फत डिक्लेरेशन करूनच छपाई करण्यात येते . अशा बंद वृत्तपत्राच्या संपादकांनी दिलेले ओळखपत्रही कायद्याने अवैध ठरते . तसेच ज्या वृत्तपत्राला टि.सी नंबर आहे ते हि अवैध ठरते,तर ज्या वृत्तपञाला आरएनआय प्रमाणपत्र नाही असेही वृत्तपत्र नियमात बसत नाही . या गुन्हेगारीचा कळस म्हणजे अशा बोगस संपादक पत्रकारांच्या संघटना सुध्दा अस्तित्वात आहेत ज्यांची कायद्यानुसारनोंदणी सुध्दा करण्यात आली नाही अशा अवैध पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ज्या संपादक / पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देवून पुरस्कृत केले आहे असे शासनमान्य पत्रकार तसेच केंद्र शासन अंतर्गत आरएनआय प्रमाणपत्र धारक वृत्तपत्रांचे संपादक व त्या संपादकाने ओळखपत्र दिलेले पत्रकार शासनमान्य जाहिरात यादीत समाविष्ट असलेले व प्रकाशित होणारे वृत्तपत्रांचे संपादक प्रतिनिधी , विभागीय दैनिकांचे प्रतिनिधी स्थानिक चालू वृत्तपत्रांच्या संपादकांनी नियुक्त केलेले माध्यम कर्मचारी पत्रकार तसेच टी.व्ही पत्रकार कॅमेरामन हेच फक्त अधिकृत माध्यम प्रतिनिधी आहेत. नुसते टि.सी नंबर,पोर्टल व युट्युब चॅनलला शासनाची मान्यता नाही . म्हणुन नुसत पोर्टल व युट्युब न्युज चॅनलही अनाधिकृत आहेत . खऱ्या माध्यम प्रतिनिधींची अधिकृतयादी जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडून घेवून ती पोलिस प्रशासनाला देण्यात यावी व ती यादी जाहीर करण्यात यावी मा .जिल्हाधिकारी व मा . जिल्हा पोलिस प्रशासन यांनी बोगस पञकारांना थारा देऊ नये, कायदेशीर कारवाही करावी.पत्रकारितेच्या शिक्षणासाठी उघडलेल्या सर्व संस्था,डिप्लोमा,डिग्री सर्टिफिकेट कोर्स हे सर्व बंद करा. कारण कोणी उठतय माईक आणि आयकार्ड घेतोय आणि स्वतःला पत्रकार म्हणून मार्केटमध्ये फिरतोय आणि या सर्व वृत्तीमुळे पत्रकार मात्र बदनाम होतोय पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता करणारे कमी आणि ब्लॅकमेल, कॉपी-पेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.गुन्हेगारी क्षेत्रातील किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक स्वतःच्या नावाने वृत्तपञाची नोदंणी करतात. नाही झाले तर बायको,मुलगा,भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावाने रजिस्टर करतात आणि मार्केटमध्ये संपादक पत्रकार म्हणून लोकांना ब्लॅक मेल करतात किंवा दहशत करतात अशा पत्रकारांना प्रशासनाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.पञकार परिषदेत किंवा वृत्तांकन करताना. प्रश्‍न विचारतोय का? सल्ला देतोय याचाही भान राहत नाही मात्र यावर सामाजिक कार्यकर्ते नेते हे मात्र सर्वच पत्रकारांना टारगेट करतात.बोगस पञकारांना खरे तर थारा दिला नाही पाहिजे.गैरसमज मनात धरून संपूर्ण पत्रकार जातीला शिव्या देतात सध्याच्या परिस्थितीत कोवीड काळात तर अनेक पत्रकार वाढले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत गुन्हेगार आहेत का पत्रकार आहेत हेच समजत नाही मात्र सरकारी कार्यालय आणि राजकीय कार्यालयात ठामपणे पत्रकार असल्याच्या वावर करतात. त्यामुळे बातम्या खर्‍या-खोट्या ओळखणं खूप अवघड होतं आणि पत्रकारिता क्षेत्रात शैक्षणिक अभ्यासक्रमात शिक्षण घेऊन पत्रकारिता करणाऱ्या समोर मात्र अडचणी उभ्या राहतात यावर मोठमोठे दैनिक,साप्ताहिक,टि.व्हि चॅनल वाले मूग गिळून आहेत मात्र त्यांच्याच दैनिक साप्ताहिक मधील जाहिरात प्रतिनिधींना मोठमोठे टारगेट दिलेले असतात. त्याच्यावर याचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो मोठमोठ्या जाहिराती सुरुवातीला मिळत होत्या मात्र आता या बोगस पत्रकारांना मुळे कमी झाले आहेत आणि मोठमोठे चॅनल वृत्तपत्र दैनिक,साप्ताहिक,टि.व्हि चॅनल वाले हे मात्र त्या जाहिरात प्रतिनिधींना टारगेट पूर्ण होत नाही म्हणून काढून टाकतात अशा अनेक गोष्टींना पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या पत्रकारांसमोर अनेक मोठमोठ्या अडचणी उभे राहतात. संपूर्ण बोगस पत्रकारांची एक जमात तयार झाली आहे ती पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांसमोर अरेरावीची भाषा करून दमदाटी धाकदपटशा व दहशत करण्याचा प्रयत्नही करतात त्यामुळे अनेकदा या बोगस पत्रकारांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र याचा खूप मोठा परिणाम हा समाजावर हि घडत असतो याकडे पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक संस्था प्रशासन याकडे लक्ष देईल का? यावर ठोस पावले उचलतील का? जर उचलू शकत नसतील तर माझे सरकारला आव्हान आहे आपण सुरू केलेल्या पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व संस्था,शाळा,काॅलेज,डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स या बंद कराव्यात पोलीस आयुक्तालय असेल जिल्हा आयुक्तालय असेल या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सर्व क्षेत्रातील प्रशासनाने त्यांच्या आवारात येणाऱ्या पत्रकारांची चौकशी केली पाहिजे, त्यांचे शिक्षण आणि ते पत्रकारितेच्या शिक्षणात पारंगत आहेत का? या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत अन्यथा उद्या अजून कोणी उठेल आणि स्वतःला पत्रकार म्हणून कुणाला ब्लॅकमेल करेल कुणाकडे खंडणी मागेल मात्र या सर्व प्रकारांमध्ये पत्रकार जात ही बदनामी होत राहील मोठमोठे दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही चॅनल वाले यांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ठोस पावले उचलण्याची गरज आहे.अनेक लोक संभ्रमात पडतात पत्रकाराच्या विरोधात बोलायचं कसं पण मात्र बोगस पत्रकार आहे की नाही हे आपण तपासले पाहिजे आपण आपल्या मुलांना पत्रकारिता क्षेत्रात शिक्षणासाठी पाठवतात त्यावर अनेक बोगस पत्रकार समाजामध्ये फिरत असतात शे- पाचशे रुपयांसाठी स्वतःला पत्रकार दाखवतात त्यामुळे समाजाचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत आहे पत्रकारांना तुच्छ समजण्यास लोकांची सुरुवात व्हायला लागलेली आहे त्यामुळे यावर ठोस पावले उचलण्याची काळाची गरज आहे. काही काही पत्रकार खोटे दाखले खोटे डॉक्युमेंट बनवून अनेक कित्येक वर्षापासून स्वतःला मोठा पत्रकार आहे असे भासवत आहेत तर काहीनी बोगस रित्या अधिस्वीकृती कार्डधारक ही आहेत याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा तो दिवस दूर नाही कि पत्रकारांनाही स्वतःचा न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागेल पत्रकारिता क्षेत्रात चाणाक्ष निपुण राहावं लागतं मात्र काही बोगस पत्रकारांमुळे समाजामध्ये काम व चर्चा करत असताना राजकीय पुढारी सहज पत्रकार म्हणून डावलून टाकतात त्यामुळे पत्रकारांची किंमत कमी होत चालली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक स्वताच वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करत आहेत शहरात खूप पत्रकार झाले आहेत गावात खूप पत्रकार झाले आहेत. शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात खूप पत्रकार झाले आहेत नक्की कुणाकुणाला बोलवायचं असे अनेक प्रश्न सामाजिक राजकीय नेते विचारत आहेत अचानक एवढे पत्रकार आले कुठून असाही प्रश्न निर्माण होतो मात्र पत्रकारांची छबी याच्यात कुठेतरी बदनाम होत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सरकारने यावर निर्बंध घातले पाहिजेत वेळीच या बोगस पत्रकारांना जरब बसवली पाहिजे अन्यथा हा क्राईम क्षेञातही पत्रकारितेच्या नावाने मोठमोठे क्राईम ही केले जाऊ शकतात. याची खबरदारी सर्व पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांनी मोठमोठ्या दैनिक, साप्ताहिक व टीव्ही चॅनल्स वाल्यांनी खबरदारी घेतली.पाहिजे राजकीय,सामाजिक नेत्यांनीही पत्रकारांना बोलवताना त्या पत्रकाराची माहिती घेतली पाहिजे अन्यथा सोशल मीडिया वरती पडणाऱ्या पोस्ट ह्या त्यांच्या अडचणीत भर पाडणार आहे.बोगस पञकार दहशती साठि काही ही करु शकतात. अनेक गोष्टी लक्षात घेऊन आपण पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडे लक्ष दिले पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे.पञकार हा टिकला पाहिजे जगला पाहिजे ह्या बोगस पञकारांवर करडी नजर ठेवुन यांना बाहेर काढले पाहिजे,त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.

संपादक-विकास कडलक
मो.न.9970280443

Previous articleदेहुरोड-बुद्ध विहार कृती समितीची दहशत वाढली धम्मभूमीवर पोलीसही असुरक्षित पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजेंना धक्काबुक्की
Next articleआता भाजपा चले जाव चा नारा देण्याची गरज आहे – डॉ. कैलास कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 9 =