देहुरोड,दि.23 जानेवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी चे पवित्र आज झाले खराब बुद्ध विहार ट्रस्ट आणि बुद्ध विहार कृती समितीला एकत्र बसवुन समाजाला हव आहे बुद्ध विहार, त्यामुळे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आस्थी स्तूप आणि बुद्धरुप सहीत विहार जतन करून पुढच्या पिढीला देणे लागते.त्यामुळे समाजाने स्वतः पुढाकार घेत फक्त बुद्ध विहार बांधकामाचं बोला असं सर्वांना सांगत आहेत. 32 वर्षापासून विहाराचे काम सुरू होणार हेच लोक ऐकत आहेत. त्यामुळे दर रविवारी होणाऱ्या बुद्ध वंदने ला समाज एकत्र जमतो पण विहाराची अवस्था पाहून दर्शन घेऊन वंदना घेऊन निघून जातो मात्र गेल्या दोन वर्षापासून सर्वच गोष्टी उघडया पडत आहेत. त्यामुळे समाजासमोर सत्य घटना पोहोचत आहेत. 16 जानेवारी 2022 रोजी रविवारी विहारात काशिनाथ सूर्यवंशी यांनी कबुली दिली की बुद्ध विहारा ची जागा बुद्ध विहार समिती म्हणजेच आत्ताची बुद्ध विहार ट्रस्ट यांच्या नावे आलोट झाली होती.पण त्यावेळी सिताराम उर्फ टेक्सास गायकवाड व आम्ही त्याचा गैरफायदा घेत कृती शब्द टाकून नवीन संस्था बनवून त्या पेपर मध्ये गैर प्रकार करत ही जागा काबीज केली मात्र विहाराचा काम झाले नाही. सिताराम उर्फ टेक्सास गायकवाड याचे मनसुबे लक्षात आल्याने काशिनाथ सूर्यवंशी यांनी त्यांची साथ सोडून समाजासोबत उभ राहणं पसंत केलं अशी माहिती सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यानंतर आज दि. 23 जानेवारी 2022 रोजी वंदनाला सर्व लोक जमले मात्र बुद्धविहारात गर्दी करू नये व विहारात शांतता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने काही संघटनांची बैठक घेतली होती त्यात समाज म्हणून काही लोक त्या बैठकीत होते त्यांना 149 ची नोटीस देण्यात आली होती मात्र समाजाला फक्त विहार हवे आहे. त्यामुळे वंदनेसाठी सर्व जमले असता दोन्ही वाद करत असलेल्या संस्थांचे पदाधिकारी हजर होते. त्यामुळे त्यांना एकत्र बोलावून समाजाने विहार बांधण्याच्या संदर्भात प्रस्ताव ठेवला विहार हे ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचे पवित्र स्थान आहे. त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्व समाजाने गळ घातली. पण बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष सिताराम उर्फ टेक्सास गायकवाड यांना ते नको आहे. त्यांचं समाजाने 45 मिनिटे सर्व ऐकले मात्र समाजाचे म्हणणे टेक्सास गायकवाड ऐकायला तयार नाहीत त्यांच बोलून झाल्यावर ते म्हटले माझं बोलून झालं आता मी जातो. त्यावेळी समाज बांधव म्हणून अमोल नाईकनवरे यांनी गायकवाड यांना विनंती केली की आम्ही तुमचं ऐकल आहे आता समाजाचाही तुम्ही ऐकावं मात्र अहंकारात असलेले टेक्सास गायकवाड यांनी तु भाजपचा कार्यकर्ता आहे तुझा इथं काय सबंध तू पहिला इथुन निघ असे बोलल्या मुळे अमोल नाईकनवरे यांचा अंगावर बुद्धविहार कृती समितीचे काही पदाधिकारी व तेथे वास्तव्यास असलेले काही लोक हे नाईकनवरे च्या अंगावर गेले त्यामुळे समाजामध्ये जन आक्रोश निर्माण झाला व बाचाबाची ला सुरुवात झाली मात्र टेक्सास गायकवाड,अशोक गायकवाड,धर्मपाल तंतरपाळे, अजय गायकवाड,विजय गायकवाड,बंटी गायकवाड, श्रीकांत गायकवाड, विद्या जाधव,मंदाकिनी भोसले, व अन्य काही महिला यांनी मारहाणीला सुरुवात केली त्यात ते भांडण पाहून देहूरोडचे क्राईम पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे सोडवण्यासाठी मधी गेले असता श्रीकांत गायकवाड यांनी त्याची कॉलर पकडून सर्वांनी निकाळजेचा अंगावर जात धक्काबुक्की केली हात उचलला मात्र RCP चे जवान तिथे आले असल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना प्रोटक्शन देत पोलीस प्रशासनावर हात उचलणाऱ्या ना प्रसाद दिला व जमाव पांगवला.मात्र समाज हा ऐकण्याच्या भूमिकेत नव्हता तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील आल्या त्यांनी जनतेला संबोधित करून सर्व परिस्थिती शांत केली व जे घडले ते सर्व प्रकार पोलीस स्टेशनला जाऊन ज्या महिलांना मारहाण झाली व पोलिस प्रशासनावर हात उचलला गेला त्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.बुद्ध विहार कृती समिती व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची दहशत पाहून जनतेतून आक्रोश व्यक्त केला जात आहे,पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त दिला असता तर हा गैरप्रकार टळला असता. पोलीस निरीक्षकावर हात उचलला गेला नसता पोलीस प्रशासनाला सुद्धा ते लोक जुमानत नाहीत धम्मभूमी हे गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललाय अशा चर्चांना मात्र संपूर्ण परिसरात उधान आले आहे.त्यावर पोलिस प्रशासन व कॅन्टोन्मेट प्रशासन काय कारवाही करतील व निर्णय घेतील या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.
149 नोटीस देऊनही,पोलिस बंदोबस्त का दिला नव्हता,गुरुद्वारा,चर्च,मजीद,मंदीर या ठिकाणी प्राथनेना,धार्मीक कामासाठी जमणार्यांनवर 188 चे गुन्हे दाखल केले आहेत का? त्याची माहीती देहुरोड पोलिस प्रशासन देणार का?ज्यांनी हल्ला घडवला पुर्वेनियोजीत त्या गुंडावर चे गुन्हे दाखल करण्या ऐवजी,वंदनेला जमणार्या समाजबांधवान वर दंगलीचे आणि पॅन्डमिक Act चे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.माञ बुद्ध विहार समितीचे लोकांनी हत्यारा सहीत भांडणाच्या तयारीत होते.ते पोलिसांनी राॅड दांडके जप्त केल्याने RCP जवानांना पाहुन बाकींच्या हत्यारे लपवत पलायन केले.जाणुनबुजुन पोलिस बंदोबस्त देण्यात आला नव्हता.एक पोलिस निरिक्षक फक्त त्या घटना स्थळी होते.वंदनेला आलेली जनता पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांना ओरडुन सांगत होते.त्या लोकांनकडे हत्यारे आहेत.त्यालोकांनी सर्वांच्या समोर पोलिस निरिक्षकांना मारले आहे.तरी सुद्धा कोणतीही दखल न घेता उलट शांततेत वंदनेवर जमलेल्यांनवर गुन्हे दाखल केल्याने सर्वानी वरिष्ठ पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील मॅडम यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.