Home ताज्या बातम्या कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिलांच्या भजन स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे...

कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिलांच्या भजन स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

0

पिंपरी,दि. २४ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची पायाभरणी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे कै. सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिनानिमित्त गतवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामधे महिलांसाठी भजन स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ‘महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

कॅरम स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी २९ जुलै पर्यंत नाव नोंदणी करावी. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील कै. मनीषा भाऊसाहेब भोईर विरंगुळा केंद्र येथे कॅरम स्पर्धेचे उद्घाटन २९ जुलै रोजी सकाळी ८:३० होईल. तर महिलाच्या भजन स्पर्धेचे उद्घाटन ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता, मनीषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड (भाऊसाहेब भोईर यांचे कार्यालय) येथे होणार आहेत.
या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ ३१ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता, मनीषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड (भाऊसाहेब भोईर यांचे कार्यालय) येथे होणार आहे.
कॅरम स्पर्धेत मध्ये सहभाग घेण्यासाठी अविनाश कदम ८२३७००९०१२ आणि भजन स्पर्धेसाठी नीलम शिंदे ९५४५५५८७४८ यांच्याशी साधावा असेही आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

Previous articleजमीन सुधारणा आणि त्यासंबंधी च्या कृतींच्या पूर्ततेसाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य आगामी 3 वर्षांत पूर्ण करणार
Next articleशिवसेना शिंदे गटाकडून देगलूर- बिलोली मतदार संघात मंगेश कदम यांचे नाव चर्चेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × three =