Home ताज्या बातम्या ‘कोण आले रे!कोण आले!, भाजपचे चोर आले” टर उडवत महापालिका प्रवेशद्वारावर वंचितचे...

‘कोण आले रे!कोण आले!, भाजपचे चोर आले” टर उडवत महापालिका प्रवेशद्वारावर वंचितचे अंदोलन

110
0

पिंपरी,दि.21ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्या नंतर जी बी च्या दिवशी(दि.20) वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार ठिय्या आंदोलन केले. सर्वसाधारण सभेसाठी येणाऱ्या भाजप नगरसेवक दिसले की त्या पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवून ‘कोण आले रे!कोण आले!, भाजपचे चोर आले…’ अशा घोषणा देत टर उडविली. सार्वजनिक मालमत्तांचे होणारे खासगीकरण तत्काळ बंद करा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते आयुक्त राजेश पाटील यांना देण्यासाठी आले होते. मात्र, काही मिनिटे अगोदरच शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला गेले होते. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखले. त्यामुळे पालिका परिसर भाजप विरोधी घोषणांनी दणाणुन गेलता.

पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष अंकुश कानडी, महासचिव राजन नायर, संजीवन कांबळे,के.डी.वाघमारे,संतोष जोगदंड, महिला आघाडी शहराध्यक्षा लता रोकडे, महासचिव सुनीता शिंदे, गुलाब पानपाटील, अशोक कदम,राहुल बनसोडे, साहेबराव जगताप, दिनकर ओव्हाळ, शारदा बनसोडे, राहुल सोनवणे, धनंजय कांबळे आदी.पदाधिकारी यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन वेळी उपस्थित होते.

Previous articleभाजपा आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची भूमिका सत्य लवकर बाहेर येईल ; चेअरमन नितीन लांडगे यांना गोवण्याचा प्रयत्न
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज किरणराजे भोसले यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 17 =