Home ताज्या बातम्या शालेय शैक्षणिक सत्र 2020-21; संपूर्ण शाळा ( खाजगी व शासकीय) ह्या 30...

शालेय शैक्षणिक सत्र 2020-21; संपूर्ण शाळा ( खाजगी व शासकीय) ह्या 30 सप्टेंबर 2020 नंतरच सुरु कराव्यात-अशिष सोनटक्के(भिमआर्मी जिल्हाध्यक्ष वर्धा)

45
0

वर्धा,दि 11 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-शालेय शैक्षणिक सत्र 2020-21 व संपूर्ण शाळा ( खाजगी व शासकीय) ह्या कोरोना महामारी संकटाच्या काळात 30 सप्टेंबर 2020 नंतरच पुन्हा सुरु करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने विचार करावा या हेतूने,कोरोना महाभयंकर महामारीच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार व प्रशासन यांच्या शालेय शैक्षणिक सूत्रानुसार जिल्हापरिषद व सर्व शासकीय शाळांना हे येत्या जुन महिन्याच्या शेवटी सुरु करण्याची हालचाली दिसून येत आहे म्हणून आम्ही वर्धाकरांच्या वतीने खालील मुद्दे निवेदना द्वारे सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयन्त भिमआर्मी वर्धा जिल्याच्या वतीने करण्यात आला

1) महाराष्ट्र राज्य सरकार ने घोषित केल्याप्रमाणे 10 जुन ते 30 सप्टेंबर हे आपल्या राज्यातील पावसाळी सत्र असतें. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्या ऋतू लक्षात घेता लहान मुलांना (वर्ग 1 ते 5 वी ) यांना ताप, सर्दी आणि खोखला या रोगांचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो जेणेकरून आपल्याला वरील लक्षणे हे कोरोना महामारी रोगाशी साम्य असल्यामुळे त्या चिमुकल्यांचा जीव धोख्यात टाकणे हे पालकांना व प्रशासनाला बेताचे ठरेल तसेच कोरोना च्या काळात लहान मुलांना शारीरिक अंतर ठेवून नित्य उपक्रम करून घेणे हे खूप अवघड आहे.

2) महाराष्ट्रातील तसेच वर्धेतील संपूर्ण खाजगी संस्थेच्या शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याची कवायत सुरु केली आहे परंतु त्यांच्या शाळेमध्ये जे गरीब विध्यार्थी RTE(Right to education) च्या माध्यमातून प्रवेशङ मिळाला आहे त्यांनी ह्या शाळांच्या गरजा कश्या भागवाव्या आणि त्या पालकांनी काय कराव ज्यांना हाताशी रोजगार पण नाही राहिला आहे.

3) प्रत्येक गाव पातळीवर जिल्हापरिषदेचीही वर्ग 1 ते 5 वी व बलाढ्य संस्थाधारकांची खाजगी वर्ग 5 ते 10 वी अश्या शाळा आहेत परंतु सर्व खाजगी शाळा ह्या त्यांच्या शिकवण्या सुरु करण्यात तयार आहेत कारण त्यांचे विध्यार्थी हे वयानी मोठे असल्यामूळे शारीरिक अंतर ठेवून शिकून पण घेतील परंतु या दबावामुळे गावातील पालक आपल्या चिमुकल्यांनापण जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 ते 5 वी मध्ये पाठवण्यात तयार होतील यात काही दुमत नाही.

4) खाजगी शाळा ह्या पालकांना राज्य सरकारची सहमती दर्शवून ऑनलाईन क्लाससेस ची योजना राबवत असून भरगोस फीस साठी सामान्य पालकांना वेठीस धरू पाहते आहे. आत्ताच आपल्या देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी स्पष्ट सांगितले होते की शैक्षणिक सत्राचा आणि शाळांना सुरु करण्याचा विचार हा ऑगस्ट 2020 नंतर घेऊ. तसेच बहुतांशी पालकांनी खाजगी शाळेत मागील(2019-20) शैक्षणिक सत्राची फी पूर्ण भरलेली असतांना ज्यामध्ये मार्च ते एप्रिल 2020 मध्ये शाळा पूर्णपणे बंद पडल्यामुळे त्या दोन महिन्याचा फी परतावा कुठल्याही पालकाने मागितलेला नाही. मग आता जर काही महिने शैक्षणिक सत्र पुढे जात असेल तर खाजगी शाळेनी फी साठी पालकांना वेठीस धरू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकार कडून प्रशासनाला व खाजगी शाळेंना देण्यात यावे.

5) सर्व शाशकीय शिक्षक वर्ग हा संपूर्ण कोरोना काळात आपला जीव धोक्यात टाकून कोरोना वॉरियर्स बनून तो संपूर्ण लोकडोवन मध्ये शासनाला सहकार्य करीत आपली सेवा बजावत राहिलेला आहे त्यामुळे आम्हाला त्या सर्व शिक्षकांचा अभिमान आहे परंतु शालेय सत्र सुरु करण्यात जर राज्य सरकार उतावीळता दाखवेल तर विध्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण गावातील लोकांचा जीव आपण धोख्यात टाकू हे निर्विवाद सत्य राहील. याच तत्काळ उदाहरण म्हणजे फ्रान्स आणि इस्राईल या देशातील 7000 विध्यार्थ्यांना एकाच दिवशी विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे शाळा सुरु केल्यामुळे .

शैक्षणिक सत्र हे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु करण्यात येऊ नये तसेच खाजगी शाळेंना फीस वसुली पण 30 सप्टेंबर पर्यंत बंद करावी याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला त्वरित द्यावे असा विनंती अर्ज निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,वर्धा यांच्या मार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य देण्यात आले या वेळी जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के ,बंटी रंगारी प्रशिल पाणबुडे ,आकाश पाझारे ,दीक्षित सोनटक्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमावळ-नानोली ! जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन विकलांग मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अरोपीवर विनयभंगासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Next articleराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 17 =