Home ताज्या बातम्या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

56
0

बीड,दि.12 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- महाराष्र्ट राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले असुन. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

Previous articleशालेय शैक्षणिक सत्र 2020-21; संपूर्ण शाळा ( खाजगी व शासकीय) ह्या 30 सप्टेंबर 2020 नंतरच सुरु कराव्यात-अशिष सोनटक्के(भिमआर्मी जिल्हाध्यक्ष वर्धा)
Next articleसर्वजीत बनसोडे,संजीवन कांबळे,राहुल खांडेकर यांची BRSP अॅड सुरेश माने यांच्या पक्षातुन हक्कलपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + one =