Home ताज्या बातम्या सर्वजीत बनसोडे,संजीवन कांबळे,राहुल खांडेकर यांची BRSP अॅड सुरेश माने यांच्या पक्षातुन हक्कलपट्टी

सर्वजीत बनसोडे,संजीवन कांबळे,राहुल खांडेकर यांची BRSP अॅड सुरेश माने यांच्या पक्षातुन हक्कलपट्टी

98
0

पिंपरी,दि.16जुन2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-बहुजन रिपब्लिकन सोशियालिस्ट पार्टी -अॅड.सुरेश माने गट या पक्षाने वेळोवेळी दिलेले आदेशाच व सूचनांचे पालन न करणे, पक्ष शिस्तीचे पालन न करणे व अनेकवेळा सावध करून देखील वर्तवणुकी मध्ये सुधारणा न करणे अशी कारणे दाखवत. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मधुन सर्वजीत बनसोडे महाराष्र्ट राज्य युवक अध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजीवन कांबळे व पिंपरी चिंचवड शहर महासचिव राहुल खांडेकर यांची बी आर एस पी चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. (डॉ.) सुरेश माने सरांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.तसेच बहुजन संघटक ह्या फेसबुक पेज चा व बी आर एस पी चा काही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.त्या मुळे बहुजन संघटक या पेज वरुन बी आर एस पी मध्ये हे कारवाही चे सञ सुरु झाल्याचे दिसत आहे.सर्वजीत बनसोडे यांची केद्रीय कार्यालय कडुन पञाद्वारे तर संजीवन कांबळे व राहुल खांडेकर यांची जिल्हाध्यक्ष धिरज बगाडे यांच्या लेटरहेड वर हाकलपट्टी केली आहे,सदर दोन्ही पञ सोशल मिडियावर वायरल होत आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी हि नव्याने गठीत करण्यात येणार असुन संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात येतआहे.असे ही पञा मध्ये उल्लेख करण्यात आले आहे.अशा प्रकारच्या कार्यवाही मुळे

बी आर एस पी या पक्षामधुन राजीनामासञ सुरु झाल्याचे पाहिला मिळत आहे.तसेच सोशलमिडियावर ही सकाळपासुन हक्कलपट्टीची चर्चा रंगली असुन सर्वजीत बनसोडे,संजीवन कांबळे,राहुल खांडेकर यांच्यासमर्थनात पदाधिकारी कार्यकर्ते पक्षावर नाराजी व्यक्त करत आहेत.

संजीवन कांबळे यांनी कारवाहीचा निषेध व्यक्त करत केला खुलासा

संजीवन कांबळे,(पिंपरी चिंचवड शहर)

मला पक्षातून काढण्यात आले याचं कारण मला आतापर्यंत काही समजले नाही ज्या कारणामुळे आमचे सहकारी सर्वजीत बनसोडे आणि राहुल खांडेकर यांना पक्षातून काढुन टाकण्याची कार्यवाही केलेली आहे बहुजन संघटक या नावाचे फेसबुक पेज आहे मोठ्या प्रमाणात त्यावर लोक जुडत आहेत, परंतु माझा हया पेजशी काहीही संबंध नसताना देखील माझ्यावर अन्यायकारक पद्धतीने कार्यवाही करण्यात आलेली आहे.सदर अशा चुकीच्या कार्यवाहीचा व सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी मी निषेध करतो.

Previous articleराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण
Next articleपोलिस आयुक्त पोचले नाही तिथ अनावधानाने पोचले पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + 10 =