Home ताज्या बातम्या पोलिस आयुक्त पोचले नाही तिथ अनावधानाने पोचले पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त

पोलिस आयुक्त पोचले नाही तिथ अनावधानाने पोचले पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त

84
0

पिंपरी चिंचवड शहरात खुलेआम मटका सुरु पोलीसांचे अक्ष्यम दुर्लक्ष

पिंपरी,दि.17 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पोलिस आयुक्त ज्या ठिकाणी पोचायले हवे त्या ठिकाणी मान्सुन पुर्व पहाणी दौरा दरम्यान सांगवी येथील नाल्याची पहाणी करत असताना पिंपरी चिंचवड महपालिका आयुक्त अनावधानाने पोचले मटका अड्यावर,पाहुन झाले चकीत पञकारांनी यावर प्रश्न उपस्थित केला असता,आयुक्त हार्डीकर म्हणाले मी पोलिस आयुक्तानां फोन करुन सांगितले आहे त पोलिस कार्यवाही करतील.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ओपन आणि क्लोज मटका चांगलाच जोमात चालला असून लाखो रूपयाची उलाढाली बरोबर वरीष्ठाचे उखळ पांढरे करणार्‍या व अनेकांची घरे व कुटुंबे उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या आशिर्वादावर सुरू आहे ? याचा प्रत्यय आज सांगवी भागात आयुक्त यांचे सोबत मान्सुन पुर्व पुर नियंत्रण प्रभाग पाहणी दौऱ्यावर असताना आला.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे समवेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच संबधित अधिकारी यांनी सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मान्सुन पुर्व पुर नियंत्रण कामाची पाहणी करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसुन आल्या. म्हणून प्रत्यक्ष जावुन पाहणी केली असता काही जणाकडे असणाऱ्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकुन पसार झाले. तसेच त्या ठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले. अशाच प्रकारे शहरात अवैध मटका, जुगार, सोरट असे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालु असणार आहेत. शहरात कोरोनाचे सावट असताना याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात गरीबांना शोषित केले जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला.पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. मटक्यामुळे या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून मटक्यासाठी अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक या मुळे बरबाद होण्याची भिती आहे, तरी पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालुन असा मटका तातडीने बंद करावा, याबाबतच्या सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिल्या.

सदर बाब पोलिसांच्या निदर्शनास आणुन देण्यात आली आहे


आयुक्त-श्रावण हार्डिकर
पिंपरी चिंचवड महानगर पालिका

पावसाळापूर्व कामांची पाहणी करताना सांगवी येथे अचानकपणे एका ठिकाणी (जुगार) मटका अड्डा सुरू असल्याचे दिसून आले. सदर बाब पोलिसांच्या निदर्शनास आणुन देण्यात आली आहे. तसेच संबंधित अनधिकृत शेडवर निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Previous articleसर्वजीत बनसोडे,संजीवन कांबळे,राहुल खांडेकर यांची BRSP अॅड सुरेश माने यांच्या पक्षातुन हक्कलपट्टी
Next articleएमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम,मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × five =