Home ताज्या बातम्या एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम,मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर...

एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम,मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम

77
0

सातारा,दि.19 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी-अजय पोळ):-एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत.प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातून झाले आहे. त्याचे वडील शहापूर MIDC मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात तर आई हाऊस वाईफ आहे. प्रसाद याच्या निकालानंतर त्याच्या कोयनावसाहत येथील घरात अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे.कूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे. 13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सातारा येथील चौगुले प्रसाद बसवेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पूर्व परीक्षेला एकूण 3,60,990 विद्यार्थी बसले होते. यातून मुख्य परीक्षेला 6825 विद्यार्थी पात्र ठरले होते आणि आज 420 यशस्वी विद्यार्थी हे अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरले आहेत.

Previous articleपोलिस आयुक्त पोचले नाही तिथ अनावधानाने पोचले पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त
Next articleWhatsApp झाले down;अनेक फीचर्स अचानक गायब,गोंधळे युजर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 19 =