देहुरोड,दि.20जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-Whats App हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं APP आहे. मात्र या अॅपची अनेक फीचर्स गायब झाल्याची तक्रार भारतातले युजर्स करत आहेत. तर जगातल्या इतर काही देशांमध्येही या APP ची फीचर्स गायब झाली आहेत. Last Seen, Online Status ही फीचर्स काम करत नसल्याचं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. डाऊन डिटेक्टरवर आज Whats App डाऊन झाल्याचे सुमारे ४ हजार रिपोर्टस आले. ७३ टक्के लोकांना Whats App वापरताना फीचर्सच्या अडचणी येत आहेत. तर २४ टक्के लोकांना लास्ट सीन दिसत नाहीये असं डाऊन डिटेक्टरनं म्हटलं आहे. अनेक युजर्सना प्रायव्हसी सेटिंग्जचाही इश्यू येतो आहे.युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपसह भारतात Whats App युजर्सना काही समस्या जाणवत आहेत. लास्ट सीन हे फीचर आपोआप बंद झाले आहे. त्यानंतर ते सुरु न होणं ही समस्या जाणवते आहे. Does anyone know what’s going on with whatsapp ? अशा पोस्टही करणं सुरु झालं आहे.ऑनलाइन आहोत हे दाखवणंही बंद झालं आहे तर मेसेज टायपिंग करतो आहोत हे फीचरही बंद झालं आहे. नेमकं हे होण्यामागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. मात्र अनेक युजर्सना ही समस्या भेडसावते आहे.काही युजरसने त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करत आहेत. WhatsApp update… Last seen, See online, See Typing पैकी काहीही दिसणार नाही. happy/unhappy फरक नाही पडत.#Whats App ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला आहे. हा ट्रेंड पोस्ट करत अनेक युजर्सनी काही फीचर्स काम करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनेक युजर्सनी विविध msg तयार करुन ती ट्विट करायलाही सुरुवात केली आहे.Whats App हे नेमकं डाऊन का झालं आहे, त्याचे काही फीचर्स का बंद झाले आहेत याचं कोणतंही ठोस उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही.