मावळ-नानोली,दि 10 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दिनांक 7 जून 20 20 रोजी दोन ठिकाणी ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला , पिंपळे सौदागर याठिकाणी प्रेम प्रकरण व जातीय द्वेषातून घटना घडली तर दुसऱ्या ठिकाणी मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नानोली गाव याठिकाणी बाल लैंगिक अत्याचार व जातीय द्वेष भावनेतून घरी कोणी नाही याचा फायदा घेत गैरकृत्य घडल्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मानवी विकृतीचे प्रकार अलीकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नानोली गावांमध्ये आरोपीने थेट दहा वर्षाच्या पीडित मुलीला उचलून घरात खाटेवर नेऊन तिची पॅन्ट काढून लैंगिक कृत्य करण्याचा प्रकार केल्याचे दिसुन आले पीडित मुलगी हि विकलांग आहे,वेळीच मुलीच्या आज्जीने पाहिल्याने आरोपीने तिथून पळ काढला.पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अरोपीवर विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन. ही घटना रविवारी (दि .7) सकाळी अकराच्या सुमारास नानोली (ता. मावळ) येथे घडली.सोन्या उर्फ सोमनाथ रघुजी काळे (वय 33, रा. नानोली, ता.मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पीडित मुलीची आजीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रविवारी सकाळी फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या नातीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.घटनेनंतर फिर्यादी यांनी हा प्रकार त्यांच्या मुलाला व सुनेला सांगितला. त्यानंतर सोमवारी (दि .8) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी भारतीय दंड विधान कायदा कलम 354 ब,452, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम2012 कलम 8, 12, अनुसूचित जाती आणि जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 कलम 3 (1) (w) (i), 3 (2), 3 (V), 3 (2) (va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती API साधना पाटील यांनी पञकारांशी बोलताना माहिती दिली तर पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील साहेब करीत आहेत.तर सोशल मीडियाच्या माध्यमातुन अरोपीना लवकारत लवकर शिक्षा व्हावी व फास्टट्रक मध्ये प्रकरणाचा छडा लावावा व अशा विृकत मानसीकता असणार्या आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचा जोर धरत आहे
Home ताज्या बातम्या मावळ-नानोली ! जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन विकलांग मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अरोपीवर...