Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई किरकोळ भाज्या विक्रेते व फळे विक्री व आठवडे...

पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई किरकोळ भाज्या विक्रेते व फळे विक्री व आठवडे बाजार १४ एप्रिल पर्यंत बंद- आयुक्त श्रावण हर्डीकर

0

पिंपरी,दि.१०एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना कोवीड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार ,मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत: प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता पासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसैर एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे.

१) भोसरी भाजीमंडई

२) चिखली भाजीमंडई 

३)चिंचवड भाजीमंडई
४)आकुर्डी भाजीमंडई
५) पिंपरी भाजीमंडई
६) थेरगाव भाजीमंडई
७)वाकड भाजीमंडई
८)सर्व आठवडे बाजार
९)पिंपरी चिंचवड शहरातील हातगाड्या
१०)कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी

११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री .

११ एप्रिल २०२० रोजी सायंकाळ ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.

Previous articleफूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Next articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + three =