Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

70
0

पिंपरी, दि. ११ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):– क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीमुळेच आज अनेक शोषितांना तसेच वंचितांना सामाजिक न्याय मिळाला. विशेषत: महात्मा फुले यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वांच्या शैक्षणिक हक्कासाठी दिलेला लढा प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापौर ढोरे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागरिकांना शुभेच्छा संदेश महापौर ढोरे यांनी दिला. महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आणि पिंपरी चौक येथील पुर्णाकृती पुतळयास आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
पिंपरी चौक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे आदी उपस्थित होते.
त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासही महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने नागरिकांनी घरातच राहून महापुरुषांची जयंती साजरी करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. त्यास प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर ढोरे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन आहे. “मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीय आहे” अशा विचारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले देशाप्रती असलेले जाज्वल्य प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले. सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करुन सर्व अनुयायांनी बाबासाहेबांचा यावर्षीचा जयंतीदिन घरी राहूनच साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील महापौर ढोरे यांनी केले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रशासकीय पातळीवर साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची रंगरंगोटी आणि पुतळा परिसर सुशोभिकरणाचे काम सुरु आहे.

Previous articleपिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई किरकोळ भाज्या विक्रेते व फळे विक्री व आठवडे बाजार १४ एप्रिल पर्यंत बंद- आयुक्त श्रावण हर्डीकर
Next article‘मदत नव्हे कर्तव्य’उपक्रमांतर्गत मावळातील १४ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटपचा विधायक उपक्रम-आमदार सुनील शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 15 =