पिंपरी,दि.07 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,मानधनावरील (समुह संघटक)एक महिला कर्मचारी यांनी आयुक्तांन कडे लेखी तक्रार केली आहे. आयुक्त हार्डिकरांनी दुर्लक्ष केल,आताचे आयुक्त राजेश पाटील त्या महिलेला न्याय देतील का ? त्या महिलेला ञास देणार्यान वर कारवाही करतील की वाचवतील या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.(समुह संघटक)मानधनावर काम करणारी महापालिकेतील महिला कर्मचारी अधिकार्यांन पुढे हतबल झाली असुन न्याय पाहिजे म्हणुन आयुक्त हार्डिकराना 04 नोव्हेंबर 2020 रोजी तक्रार अर्ज केला होता.नागरवस्ती विभागातील अधिकारी सुहास बहादरपुरे व त्याचे सहकारी इतर अधिकारी हे जास्त काळ एकाच विभागात असल्याने मनमानी करतात,त्यांची बदली झाल्यास ञास कमी होईल असे तिल वाटले पण जाणुन बुजुन अजुन मानसिक ञास देणे सुरुच आहे असा आरोप त्या महिलेने केला आहे.त्यासाठी पुन्हा 29 जुलै 2021 रोजी स्मरण तक्रार अर्ज आयुक्त राजेश पाटील यांना केला आहे.आयुक्त चांगले आणि स्वच्छ छबीचे असल्याने ते नक्की न्याय देतील व अशा टार्गेट अधिकार्यांचा बदल्या करतील असा विश्वास असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.एकाच विभागात जास्त काळ असल्याने बहादरपुरे व त्यांचे इतर सहकारी अधिकारी कर्मचारी यांचे अर्थिक हितसंबध निर्माण झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.चुकीची माहिती वरीष्ठांना देणे,दिशाभुल करणे,पिना मारणे,ती महिला कामच करत नाही ब्लॅकमेल करते असे खोटे नाटे आरोप करत असतात व विभागातील अशा घाणरेडया राजकारणांमुळे महिलेस मानसिक ञास झाला आहे.समुह संघटक मानधनावरील पद भरण्याचा ठराव 28 एप्रिल 2021ला झाला असून त्यात पहिले नाव असतानाही घेण्यास टाळाटाळ करणे.व इतरांना चुकीची माहिती देऊन बदनामी करत आहेत.मर्जी नुसार मानधना वरील समुह संघटक यांना मुख्य कार्यालयात ठेवणे व वारंवार बदली करुन नाहक ञास देणे,व चुकीची वर्तणुक करणे.अशा प्रकारे अनेक तक्रारी पिडित महिलेने अर्जात केल्या आहेत.आयुक्त साहेब न्याय देतील का या कडे सर्वाचे लक्ष वेधले असुन नागरवस्ती विभागात महिला सुरक्षित नाहीत या चर्चेला माञ उधान आले आहे.ती महिला पालिकेतील अनेक राजकीय पुढारी नेते व त्यांच्या खाजगी पी ए कडे गेली माञ तिच्या पदरी निराशाच तिला कामावर रुजु करण्यास टाळाटाळ होत आहे,तिला मानसिक ञास दिला जात आहे या कडे दुर्लक्ष करण्यात त्यांनी धन्यता मानली.काही स्वताला नांमाकीत समजणार्या पञकारांकडे गेले तर त्या पञकारांनी त्या महिलेची टर उडवली व तिच्या म्हण्य व्यवस्थित ऐकुन घेतले नाही.
त्यामुळे ति महिला हतबल झाली असुन या पीडित महिलेला आयुक्त साहेब काय न्याय देतात.समुह संघटक म्हणुन रुजु करुन घेतील का ?, 3वर्षा पेक्षा जास्त काळ काम करणारे कर्मचारी अधिकार्यांची बदली करतील का ? ञास देणार्यांनवर कारवाही करतील का ? सहा.समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे नागरवस्ती विकास योजना विभागात 15 वर्षापासुन आहेत तसेच त्यांचे जवळचे सहकारी चाटनकर हे ही जास्त काळ त्याच विभागात आहेत.त्यांच्या बदल्या होणे गरजेचे आहेत त्यामुळे नागरवस्ती विकास विभागाचे नाव बदनाम झाले आहे.या सर्व तक्रारी अर्ज करुन जर न्याय नाही मिळाल्यास अशा छळवणुक करणार्या मानसीक ञास देणार्या नागरवस्ती विभागातील चुकीचा अधिकार्यान विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्यांचे पिडित महिलेने म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भरपुर ठिकाणी 3 वर्षा पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आहेत,त्यामुळे त्यांचा कुटुंबातील सदस्यांच ठेका किंवा त्याचे अर्थिक हितसंबिध वाढतात व त्यामुळे ब्लॅकमेलिंगचे ही प्रमाण वाढु शकते असे दिसत आहे.काही दिवसा पुर्वीच आयुक्तांनी कर्मचार्याना इशारा दिला होता.माञ त्यावर चौकशी अहवाल किंंवा कारवाही अद्याप दिसत नाही.