Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदाची निवडणूक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये;प्रभारी पदी...

रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदाची निवडणूक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये;प्रभारी पदी सुर्यकांत वाघमारे यांची नियुक्ती

30
0

पिंपरी,दि.०६ जुलै २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड प्रभारी पदी माननीय सुर्यकांत वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री (भारत सरकार) रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः वाघमारे यांना पत्र देऊन नियुक्ती केली आहे वाघमारे यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील योगदान लोकांच्या हितासाठी केलेले कार्य आणि पक्षाचा व्यापक ते साठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आली आहे.सुर्यकांत वाघमारे हे पिंपरी चिंचवड,पुणे शहर वगळता पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार संभाळत असुन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पद निवडणूक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्यावी यासाठी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी केली आहे व वाघमारे यांना पुढील राजकीय वाटचालीस साठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शहर अध्यक्ष पदाची निवडणुक होणार असुन शहरात रिपब्लिकन पक्षात चुरस पाहिला मिळणार आहे.तसेच शहरात शहरध्यक्षा पदावरुन अनेकांन मध्ये नाराजी होती,अंतर्गत गटबाजीचे राजकारण वाढत चालल्याने शहरातील रिपब्लिकन पक्षाची शहराबदलची भुमीका काय हा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांनी पक्षाकडे पाठ फिरवणे पसंद केले.आता ऑगस्ट मध्ये शहरध्यक्ष पदाची निवडीमुळे शहरात नाविण्यपुर्ण वातावरण रिपब्लिकन पक्षात पहावयास मिळेल,सर्व पक्षाचे व सर्वांचे लक्ष शहरध्यक्ष पदा कडे असुन शहरात चर्चेला उधान आले आहे.

Previous articleमानवी तस्करी विधेयक 2021च्या मसुद्यावर सूचना/हरकती पाठवण्याचे महिला आणि बालविकास मंत्रालयाचे आवाहन
Next articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरवस्ती विभागातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,आयुक्त हार्डिकरांनी दुर्लक्ष केल्याने ,आताचे आयुक्त राजेश पाटील त्या महिलेला न्याय देतील का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − 3 =