आयुक्त बंगला अजुन मिळाला नाही म्हणुन त्याचा राग असा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनवर काढताय का ? आयुक्त साहेब असा खडा सवाल रयत विद्यार्थी परिषदने केला आहे
पिंपरी,दि.07 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वृक्षगणना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका समोर रयत विद्यार्थी परिषद चे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण झाले.रयत विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथिल खाजगी आणि शासकीय जागेवरील वृक्ष गणना संदर्भात मे. टेरेकोन इकोटेक प्रा.लि या ठेकेदारास वृक्षगणना संदर्भात 11जानेवारी 2018 रोजी 2 वर्षे वृक्षगणना आणि 3 वर्षे देखभालीचे काम देण्यात आले होते परंतु आज 3 वर्षे उलटून देखील वृक्षणनेचे कामकाज अपुर्ण आहे. या संदर्भात रयत विद्यार्थी परिषदेने वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या भुमिकेत आहे .या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी रयत विद्यार्थी परिषद ने पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.व काळ्या फिती लावुन महापालिका प्रशासन व ठेकेदारांचा निषेध नोंदवण्यात आला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी थोडी अश्वासन दिले,5 ते 6 दिवसात कारवाही काय केली याचा खुलासा पञाद्वारे करु,व सुभाष इंगळे उपायुक्त यांना तसे आदेश दिले,व त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
रयत विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी उपषोण अंदोलन वेळी आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यासाठी अडुन होते माञ आयुक्त कोणालाच भेटत नाहीत,पोलिसांनी आयुक्तांची भेट घडवुन उपोषण कर्त्याची उपोषण लवकर मागे घ्यावे या साठी प्रयन्त केले,माञ पोलिसांनाही आयुक्त जुमानत नाहीत.आयुक्त राजेश पाटील युपी- बिहारी,मंबई पॅटर्न राबवतात का की आयुक्त बंगला अजुन मिळाला नाही म्हणुन त्याचा राग असा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनवर काढताय का असा थेठ सवाल आयुक्तांना रयत विद्यार्थी परिषद सचिव राजु काळे यांनी उपोषण सोडते वेळी केला आहे.यावेळी उपोषण कर्ते अध्यक्ष -सुर्यकांत सरवदे,सचिव- राजु काळे,ऋषिकेश कानवटे,ओमकार भोईर,अजय चव्हाण,अक्षय कोथिंबीरे,अक्षय माहुलकर उपस्थित होते
रयत विद्यार्थी परिषदेच्या उपोषणांतील प्रमुख मागण्या
1) पिंपरी महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या खाजगी आणि सरकारी जागेवरील वृक्षगणना लवकरात लवकर पूर्ण करावी.
2)मे. टेरेकाँन इकोटेक प्रा. लि.या ठेकेदाराकडून 2 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा.
3) मे. टेरेकाँन इकोटेक प्रा. लि. या ठेकेदाराने पालिकेचा आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया घालविल्यामुळे त्याला काळया यादीत टाकण्यात यावे.
4) संबंधित ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे.