Home ताज्या बातम्या देहुरोड – “अ ब ब ब”तडीपार गुंडानी पकडली पोलिसाची काॅलर;आरोपीला अटक

देहुरोड – “अ ब ब ब”तडीपार गुंडानी पकडली पोलिसाची काॅलर;आरोपीला अटक

78
0

देहुरोड,दि.26 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांवरील हल्ले वाढत आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कुठल्याना कुठल्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोलिसांवरचा हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत आणि सध्या त्यात (covid-19)कोरोना चा काळ अशा अनेक अडचणीवर पोलीस मात करत आहे त्यात पोलिसांवर हल्ले होतात.असाच एक प्रकार दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 10:20 मिनिटांनी पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या परीसरातील देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम.बी.कॅम्प विकासनगर पाण्याच्या टाकीजवळ घडला आहे तडीपार गुंड आरोपी निखिल उर्फ लखन बाळू आगळे (वय 21)राहणार एम.बी.कॅम्प विकासनगर देहुरोड याला मा. पोलिस उप-आयुक्त परिमंडळ 2 यांच्या कार्यालयीन तडीपार आदेश क्रमांक 40/2019 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1)(अ)(ब) प्रमाणे दोन वर्ष अनुक्रमे 9 डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2021 पर्यंत जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केला होता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता देहूरोड मध्ये वावरत असल्याची बातमी देहूरोड पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेजाळ यांना माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना पूर्वकल्पना देऊन आरोपी निखील उर्फ लखन बाळू आगळे याला ताब्यात घेण्या करता गेले असता गुंड आरोपी याने देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्रीमंत शेजाळ यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व चौकशी दरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण केला आरोपी आगळे ला अटक केली असून पोलिस कॉन्स्टेबल सचिन शेजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 224/2021 भा.द.वि कलम 353,332 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास देहुरोड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे याकडे असून ते करत आहे.

आरोपी वर या आदी 3 गुन्हे दाखल आहेत अनुक्रमे – 1)गुन्हा रजिस्टर नंबर 370 ऑब्लिक 2018 भादवि कलम 384,504,506,(2)34,34  2) देहुरोड पो.स्टे गु.रजि.127/2018 आर्म अॅक्ट 4/27 प्रमाणे  3) देहुरोड,पो.स्टे. गु.रजि.476/2018 भा.द.वि 380,34

Previous articleव्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसला दिलासा दायक बातमी; हायकोर्टाचा निर्णय
Next articleनवीन भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव रुग्णालयांमध्ये महापालिका उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 4 =