Home गोंदिया व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसला दिलासा दायक बातमी; हायकोर्टाचा निर्णय

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसला दिलासा दायक बातमी; हायकोर्टाचा निर्णय

52
0

गोंदिया,दि.26 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नुकत्याच एका महत्वपूर्ण गोष्टीवर निर्णय दिला आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपवर असलेल्या ग्रुपवर एखाद्या युजर्सकडून गैर भाषेतील किंवा गैर पोस्ट टाकत असेल त्यासाठी अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही. कारण व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅडमिनकडे एखाद्या युजर्सला ग्रुपमध्ये अॅड करणे किंवा त्याला त्यामधून काढून टाकण्याचा अधिकार असतो. परंतु त्याच्याकडे पोस्ट कोणत्या संदर्भातील केली गेली आहे त्यावर कंट्रोल करण्याचा अधिकार त्याच्याकडे नसतो. अशा स्थितीत जर ग्रुप मधील एखादा सदस्य अभद्र पोस्ट टाकत असल्यास त्यावेळी तुम्ही ग्रुप अॅडमिनला दोषी ठरवू शकत नाहीत.

यासाठी न्या. जेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गोंदिया जिल्ह्यातील 33 वर्षीय तुषार तलोनेवर अर्जुनी मोरगाव पोलिसात दाखल करण्यात आलेला एफआयआर आणि कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेली चार्ज शीट फेटाळून लावण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण याचिकाकर्त्यांच्या बाजूने एस. राजेंद्र डागा यांनी आपली बाजू मांडली.

या प्रकरणी जेएमएफसी कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यानंतर ग्रुप अॅडमिन एफआयआर आणि चार्जशीट रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. तर हायकोर्टाने असे मानले की, व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिनकडे अधिकाधिक एखाद्या सदस्याला ग्रुपमध्ये अॅड करणे किंवा रिमूव्ह करण्याचे अधिकार असतात. परंतु एखाद्याने त्यात गैर पोस्ट टाकल्यास त्यावर अॅडमिन काही करु शकत नाही. अशातच आपत्तिजनक पोस्ट ही कायद्यानुसार अपराध जरी असला तरीही त्यावेळी तुम्ही अॅडमिनला धारेवर धरु शकत नाहीत. परंतु जर अॅडमिन आणि पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तिने जर हे ठरवून केले असल्यास तर तो दोषी असू शकतो.

नेमके प्रकरण काय?

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी जिल्ह्यातील सावर टोला येथील हे प्रकरण आहे. 33 वर्षीय तुषार तलोने एक व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन होता. वर्ष 2016 मध्ये एका सदस्याने महिलेच्या विरोधात एक आपत्तिजनक भाषेचा वापर केला. महिलेनुसार, व्हॉट्सअॅप अॅडमिनने त्याला ग्रुप मधून काढून टाकले नाही आणि त्याला काही बोलला सुद्धा नाही. महिलेची माफी मागणे तर दूर तिने ग्रुप अॅडिमनच्या विरोधात असमर्थता दाखवली. त्यामुळे महिलेने पोलीसात कलम 354ए आणि आयटी अॅक्ट अंतर्गत एफआयआर दाखल केला. पोलिसांनी असभ्य भाषेचा वापर करण्यासह तो एका ग्रुपचा अॅडमिन असल्याच्या आधारावर त्याच्या विरोधात एफआयआर ही दाखल करुन घेतला.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला
Next articleदेहुरोड – “अ ब ब ब”तडीपार गुंडानी पकडली पोलिसाची काॅलर;आरोपीला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + twenty =