मुंबई,दि.7 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय कुमार यांना पदाची तसेच गुप्ततेची शपथ दिली.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.