Home ताज्या बातम्या पंतप्रधान श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकांच्या 21 विद्वानांनी केलेल्या स्पष्टीकरणाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन...

पंतप्रधान श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकांच्या 21 विद्वानांनी केलेल्या स्पष्टीकरणाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन 9 मार्च रोजी करणार

85
0

नवी दिल्ली,दि.8 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :-पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी श्रीमद भगवद्गीतेच्या अकरा खंडांच्या  हस्तलिखितांच्या 21 विद्वानांच्या  स्‍पष्‍टीकरणाचे प्रकाशन दिनांक  9 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता कल्याण मार्ग, नवी दिल्ली, येथे करणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल श्रीयुत मनोज सिन्हा आणि डॉक्टर करण सिंह हे देखील यावेळी उपस्थित असतील.श्रीमद भगवद्गीता: दुर्मिळ विविध संस्कृत स्पष्टीकरणासह मूळ हस्तलिखित स्वरूपातसाधारणपणे भगवद्गीतेचा अभ्यास हा एकच भाषेत स्पष्टीकरण(टिप्पणी) देऊन प्रसिद्ध होतो. आता प्रथमच, प्रख्यात भारतीय विद्वानांनी भगवद्गीतेचे महत्त्वाच्या  स्पष्टीकरणासह  सर्वंकष आणि तुलनात्मक रसास्वाद  घेण्यासाठी एकत्रीकरण केले आहे. ही  हस्तलिखिते धर्मार्थ  धर्मादाय संस्थेने प्रकाशित केली असून ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आणि भारतीय पध्दतीच्या हस्ताक्षरात प्रकाशित केलेली  असून त्यात शंकर भाष्य पासून ते भासानुवादापर्यंत  सर्व हस्तलिखितांचा समावेश आहे. डॉक्टर करण सिंह जम्मू काश्मीर येथील धर्मार्थ ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत


        
Previous articleमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय कुमार यांनी घेतली पदाची तसेच गुप्ततेची शपथ
Next articleमंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग- आमदार अँड आशिष शेलार(भाजपा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 15 =