मावळ,03 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लेखापरीक्षण करून त्यांना चाप लावण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणावरील चर्चेत बोलताना आमदार शेळकेनी मागणी केली.
काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. दहा-बारा महिने शाळा बंद असूनही शंभर टक्के फी मागितली जात आहे. अनेक उपक्रम चालू नसतानाही त्यांची फी पालकांकडून वसूल करण्यासाठी तगादा लावत आहेत, याकडे आमदार शेळके यांनी शासनाचे लक्ष वेधले.परिस्थिती नसलेल्या पालकांच्या विनंत्यांना जुमानत नाही.फी भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास बंद करून, शाळेच्या बाहेर ठेवून, नोटीसा पाठवून त्रास देण्याचा उद्योग या शाळा करीत आहेत. अशा सर्व संस्थांचे लेखापरीक्षण करा, या संस्थांना चाप लावला पाहिजे, समज दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी शेळके यांनी केली.
Home ताज्या बातम्या ‘मुजोर’ इंग्रजी शाळांना चाप लावण्यासाठी आमदार शेळके यांनी विधानसभेत केला मुद्दा उपस्थित