Home ताज्या बातम्या बनावट चावीच्या सहाय्याने ATM मधुन 66 लाख रूपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी...

बनावट चावीच्या सहाय्याने ATM मधुन 66 लाख रूपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक ; दोघेही निघाले इंजिनिअर

55
0

पिंपरी,दि.10 आॅक्टोबर 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माऊलीनगर व वडमुखवाडी दिघी येथील दोन एस.बी.आय. बँकेचे ATM शुक्रवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने उघडून त्यातील 66 लाख रुपये चोरले होते. या प्रकरणी दोन इंजिनिय चोरट्यांना पोलिसांनी आज शनिवार दिनांक 10 आॅक्टोबर रोजी मुद्देमालासह अटक केली आहे.

मनोज उत्तम सूर्यवंशी ( वय 30 , रा . पिंपरी वाघिरे , पिंपरी ) किरण भानुदास कोलते ( वय 35 , रा . चिखली ) ( दोघेही मूळ रा.जळगाव ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . हे दोन्ही आरोपी व्यवसायाने इंजिनियर असल्याचे पोलिसांनी पञकार परिषदेत सांगितले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडीत असलेल्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन बनावट चावीच्या सहाय्याने खोलून 66 लाखांची रोकड चोरी झाल्याची तक्रार 24 सप्टेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती . तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या यांच्या दोन टिम तयार करण्या आल्या होत्या . तपासा दरम्यान , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना मिळालेल्या माहीतीवरून पिंपरी पुणे येथे सापळा रचून दोन संशयित आरोपींना दुचाकीसह ( एमएच 19 बीटी 2499 ) ताब्यात घेतले . चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली . पोलिसांनी त्यांच्याकडून एटीएम मधून चोरी केलेली 66 लाख 10 हजार 100 व 60 हजार किंमतीची दुचाकी जप्त केली आहे . गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस करीत आहेत.

Previous articleBreaking News ; खेड-आळंदी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचे कोरोनामुळे निधन
Next articleपञकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांचे वडील माजी सैनिक किसन वडघुले यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 18 =