चाकण,दि.10आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- खेड आळंदी विधानसभेततील शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले (वय.55 वर्ष).सुरेश गोरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने. त्यांच्यावर महिन्याभरापासून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरेश गोरे हे चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते.व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांंनी काम पाहिले, खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून 2014 मध्ये आमदार म्हणुन निवडुन आले होते. 2014 ते 2019 या काळात ते आमदार म्हणुन कार्यकीर्द पार पाडली.
शांत, संयमी आणि उत्तुंग असं गोरे यांचे व्यक्तीमत्व होते. प्रथम चाकण व नंतर पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. तीन चार दिवस त्यांची फुफ्फुसे काम करीत नव्हती. त्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली. सकाळी नऊ वाजता त्यांचे निधन झाले मा
सुरेश गोरे २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांना 33 हजार मतांनी हरवून शिवसेनेचे खेड तालुक्याचे पहिले आमदार झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मात्र ते मोहिते यांच्याकडून पराभूत झाले. तत्पूर्वी तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाले होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद ही अडीच वर्षे भुषविले.