देहुरोड,दि.24 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे आणि लोक डाऊन असताना देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी बलात्काराची घटना घडली आहे, दि. 22 जुलै2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता ही घटना घडली असून पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी 1)साजन मन्नु मेहरा (वय 27 वर्ष),2)अनिकेत रणवीर झिंजोड (वय 22 वर्षे), 3)रोहन राजेंद्र टाक (वय 18 वर्ष),या वरती देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये दि.23 जुलै 2020 रोजी राञी 10.33 वाजता. गुन्हा रजिस्टर नंबर 353/ 2020 भा.द.वि.क 376(1),366,324,34 या प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
सदर पीडित मुलगी ही पाटील मेडिकलमध्ये औषध घेण्याकरता पायी जात असताना आरोपी क्रमांक 1)साजन मेहरा याने त्याच्या मोटरसायकलवर बसवून घेऊन मुंबई पुणे हायवे लगत सर्व्हिस रोडवर झाडाखाली नेऊन पिडीत मुलीच्या संमती शिवाय जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवत बलात्कार केला व पुन्हा निळा रंगाची (पल्सर) मोटरसायकलवर बसवून टि.सी कॉलनी येथे नेऊन आरोपी क्र.1) साजन मेहरा व आरोपी क्र.2)अनिकेत झिंजोड यानी पीडीत मुलीस पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तसेच आरोपी 3 रोहन टाक याला शूटिंग करण्यास सांगितले अशी फिर्याद पीडित मुलीने दिली आहे सदर तिन्ही आरोपी अटक नसून देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस त्यांच्या शोधावर आहेत, घटनेचा तपास देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर यांच्याकडे असून ते पुढील तपास करीत आहेत