Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड व पुणे मधील लाॅकडाऊन हटवणार पण निर्बंध माञ 31 जुलैपर्यंत...

पिंपरी चिंचवड व पुणे मधील लाॅकडाऊन हटवणार पण निर्बंध माञ 31 जुलैपर्यंत कायम

81
0

पिंपरी,दि.23 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाऊन आज मध्य रात्रीपासून संपुष्टात येत आहे. त्यामुळं उद्यापासून शहरांमध्ये कशी परिस्थिती असेल,कसे नियोजन असेल याविषयी सर्वान मध्ये उत्सुकता होती. या विषयी आज विभागीय कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

शहरात शुक्रवार पासून म्हणजेच 24 तारखे पासुन लॉकडाऊन नसेल. मात्र 13 जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली लाॅकडाऊनची नियमावलीची जशीच्या तशीच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय विशेष अधिकारी सौरभ राव यांनी आज दिली.आॅनलाईन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हापरिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आदी उपस्थित होते. लॉकडाऊन उठवताना 13 जुलैच्या अगोदरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार किंवा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, पुण्यातील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्णसंख्या काही दिवसांनी कमी येईल. दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव व्यापार्‍यांनी दिलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
31 जुलैपर्यंत केंद्र सरकारने घालून दिलेले लॉकडाऊनचे नियम पाळण्यात येणार आहे. 13 जुलैच्यापूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या निर्बंध संदर्भात एक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. हीच नियमावली पुढेही लागू राहिल.

काय सुरू असेल?

आरोग्य सेवेशी निगडीत सर्वकाही
सर्व प्रकारची दुकाने
भाजी, मंडई, बेकऱ्या
पेट्रोलपंप
दारूची दुकाने
खासगी कार्यालये
रात्रीची संचारबंदी कायम असणार
सलून-ब्युटिपार्लर

दोन दिवसांचा लॉकडाउन?
देशात बेंगळुरू, कोलकाता अशा शहरांमध्ये आठवड्यातून दोन दिवस लॉकडाउनचा नियम लागू करण्यात आला. तसा निर्णय पुण्यात होऊ शकतो का? असा प्रश्न सौरव राव यांना विचारण्यात आला. त्यावर राव म्हणाले, ‘या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही.’ व्यापाऱ्यांना नियमावलीला विरोध करता येणार नाही, सरकारचे नियम पाळावे लागतील. मला आशा आहे की, पुण्यातील व्यापारी सर्व नियम पाळतील, अशी आशा राव यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही;गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता-उदयनराजे भोसले
Next articleदेहुरोड मधील धक्कादायक घटना बलात्कार व पिडीत मुलीस मारहाण करुन आरोपी फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − twelve =