देहुरोड,दि.8 जुलै २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):– दिनांक 5 आॅक्टोबर 2019 रोजी रात्री देवीची आरती पाहताना झालेल्या वादावरून अमित सुभाष पोटे याचा कोयता लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला होता.या खुनातील एक अरोपी कुप्रसिद्ध रावण गॅंग चा सदस्य असलेल्या आकाश विजय पवार (वय 24 )रा वाल्हेकरवाडी चिंचवड हा गेले दिड वर्षा पासुन फरार होता.त्याच्यावर चिंचवड पो.स्टे.गु.र.न . 354/19 कलम 302, 34, 143, 144, 147, 148, 149, भा द वि गुन्हा दाखल असुन तो पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेचे पोलिस नाईक फारुख मुल्ला व पोलीस शिपाई शामसुंदर गुट्टे यांना त्यांच्या खबर्याकडु जुना मोबाईल नंबर मिळाला व मोबाईल नंबरची माहिती काढल्यास अरोपीच्या गावचा पत्ता मिळाला व त्या ठिकाणाहुन तेथील काही ओळखीच्या बातमी दारा मार्फत अरोपीच्या सद्या चे लपुन बसलेले लोकेशन मिळाले,वरीष्ट पोलिस निरिक्षक बाळकृष्ण सावंत याना सांगितले वर त्यांनी ताबडतोब स पो नि गोमारे , पो शी फारूक मुल्ला बहिरट व गुट्टे यांचे पथक रवाना केले व तेथील स्थानीक पोलिसांच्या मदतीने अरोपी त्याच्या नातेवाईका कडे मु पो हडोळती,तालुका अहमदपुर जिल्हा लातुर येथे लपुन बसलेला त्या ठिकाणाहुन स्थानीक पोलिसांच्या सोबतीने अरोपी आकाश पवारला गुन्हे शाखा युनीट 5 ने केले अटक,पिंपरी चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 वॉन्टेड गुन्हेगाराच्या यादीतील हा गुन्हेगार होता.अरोपी ताब्यात घेतला असून त्याने गुन्हा काबुल केला आहे . आरोपी ला चिंचवड पोलिसस्टेशन च्या ताब्यात देणेत आले आहे,पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत सदरच्या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे साहेब, पोलीस उपयुक्त श्री सुधीर हिरेमठ साहेब व सहा पोलीस आयुक्त श्री आर आर पाटील साहेब यांनी गुन्हे शाखा युनिट 5 च्या अधिकारी व कर्मचारी यांच अभिनंदन केले आहे.युनिट ५ची कामगीरी सद्या कौतुकास्पद असुन सर्व स्तरा वरु युनिट 5 चे कौतुक होत आहे
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवचा भाऊ अविनाश उर्फ सोन्या जाधव यांचा ( दि . 17 मार्च ) खून झाला असुन निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर एक गॅरेज आहे . या ठिकाणी सोन्या हा मित्रांसोबत दारु पित बसला होता . दारू पिताना त्यांच्यामध्ये भांडण झाले होते यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी गॅरेज मधील साहित्याने सोन्याच्या डोक्यात वार करत खुन करुन पसार झाले .देहुरोड पोलिसांनी सतर्कता दाखवत सोन्या जाधवच्या खुनाच्या अरोपीना गजाआड केल आहे