देहुरोड,दि.8 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- देहुरोड येथील साईनगर परिसरातील घटना चारित्र्याच्या संशयावरून आरोपी करीम शाह अहमद शेख (वय 64 वर्ष)या व्यक्तीने रविवार दिनांक 5 जुलै 2020 रोजी सकाळी 8.30 वा त्याची पत्नी हबीदा शेख (वय 45 वर्ष) हीचा कोयत्याने वार करून खून केला होता.व अरोपी देहूरोड परिसरातून फरार झाला होता .या प्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. (रजिस्टर नंबर 536 /2020).आरोपी करीम शेख याने स्वताचा व पत्नी चा मोबाईल घटनास्थळावर टाकून पळुन गेला होता,रविवार पासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 5 चे अधिकारी व कर्मचारी हे आरोपीच्या शोधावर होते,अरोपीचे मुळगाव श्रीरामपूर येथील असल्याने अरोपीच्या गावी व त्या ठिकाणा जवळील परिसरात तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अनेक ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला पण अरोपीचा सुगावा लागला नाही. दिनांक 7 जुलै 2020 रोजी खबऱ्या मार्फत गुन्हे शाखेचे युनिट 5 चे पोलिस नाईक फारुख मुल्ला यांना त्यांच्या खबर्या कुडुन अरोपी राजंणगाव येथे आला आहे अशी माहिती मिळाली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना सांगितले की माहिती मिळाली की आरोपी हा पुणे नगर रोडवरील रांजणगाव परिसरात पिवळ्या रंगाच्या प्लेजर गाडी वरून फिरत आहे , अशी बातमी मिळताच खबर पक्की असल्याने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पोलीस नाईक भोसले व स्टाफ ताबडतोब शिक्रापूर कडे रवाना केला पोलीस नाईक भोसले व त्यांच्यासोबतचे कर्मचाऱ्यांनी व तेथील सुजान नागरिक मनोज कदम,आदेश खुळे,बंटी व काही सहकारी यांच्या सहकार्याने पोलिसांनी अखेर आरोपीला शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. पोलीसी खाकी दाखवताच अरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला खुप वेळा अडवण्याचा लांब राहण्याचा सुधरवण्याचा आरोपीने प्रयत्न केला,परंतु पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही.याचा राग वाढत गेल्याने आरोपीने रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास कोयत्याने वार करून पळून गेल्याचे कबूल केले आहे . तसेच आरोपी हा स्वतः आत्महत्या करणार होता तसे चिट्टी व दोरी सापडली,चिट्टी मध्ये अत्महत्येचे कारण लिहलेले होते दोरी व चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याप्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलिस करीत असल्याने आरोपीला देहूरोड पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आले आहे.सदर तपास देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक किरण कणसे यांच्या कडे आहे,सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई साहेब ,अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे साहेब, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री सुधीर हिरेमठ साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री आर आर पाटील साहेब , यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे , पोलीस शिपाई धनंजय भोसले , गाडेकर ,ठाकरे, बनसोडे, खेडकर, ईघारे , माने, फारूक मुल्ला , बहिरट , गुट्टे , पो हवा जाधव , किरनाळे यांचे पथकाने अथक परिश्रम घेऊन केली आहे