Home ताज्या बातम्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! बौद्ध समाजाच्या अस्मितेला धक्का

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! बौद्ध समाजाच्या अस्मितेला धक्का

47
0

मुंबई,दि.7 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राजगृह हे बौद्ध व आंबेडकरी समाजाचे चळवळीची अस्मिता आहे.राजगृहावर हल्ला म्हणजे हा आंबेडकरी समाजावरचा हल्ला आहे,माथेफिरु संकुचित मानसिकता असणार्‍या मनुवादी वृत्तीच्या ह्या हल्लेखोरोंना अटक करुन कडक शासन झाले पाहिजे.

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक असून आंबेडकरी – बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरावरुन करण्यात येत आहे.अनेक ठिकाणी वार्ता पसरल्याने संपुर्ण भारतातुन तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Previous articleजागतिक बँकेच्यावतीने गंगा पुनरूत्थान प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलर्सची मदत
Next article…पत्नीचा खून करून फरार असलेला अरोपी आत्महत्या करणार तोच गुन्हे शाखा युनिट 5 ने केले अरोपीला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 6 =