Home ताज्या बातम्या राजगृहचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही-मुख्यमंञी उद्धव बाळासाहेब ठाकरे

राजगृहचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही-मुख्यमंञी उद्धव बाळासाहेब ठाकरे

0

पिंपरी,दि.8 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल दि.7जुलै ला संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राजगृह हे बौद्ध व आंबेडकरी समाजाचे चळवळीची अस्मिता आहे. तसेच संपुर्ण समाजाची अस्मिता व श्रद्धास्थान आहे

राजगृहा’च्या आवारात बसून काही गुंडांनी धुडगुस घातला हे धक्कादायक आहे ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेचे नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे आपला ग्रंथ खजिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्र आहे राजगृहा चा अवामान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक असून आंबेडकरी – बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरावरुन करण्यात येत आहे व निषेधही व्यक्त केला जात आहे.

Previous articleरावण टोळीतील कुख्यात गुंड अकाश पवारला लातुर जिल्हातील अहमदपुर येथुन पिंपरी चिचंवड पोलिस गुन्हे शाखा ५ ने केली अटक
Next articleराजगृह वरील हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + 20 =