Home ताज्या बातम्या देवाक काळजी रे ! माणसा-माणसातले देव माणसं, तब्बल ६५ दिवस गरजूंना मुस्लिम...

देवाक काळजी रे ! माणसा-माणसातले देव माणसं, तब्बल ६५ दिवस गरजूंना मुस्लिम बांधवान कडुन मदत

73
0

देहुरोड,४ जुन २०२०,( विकास न्युज प्रतिनीधी):-कोरना कोविड- वारियर्स चा सन्मान दि.३१ मे २०२०रोजी देहुरोड पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आला, माणसातला देव शोधणारी माणसं ह्या देहूरोड मध्ये सतत कोरोनाच्या प्रादुर्भाव मध्ये ६५ दिवस गरजू गरीब मजदूर अशा अनेक ज्यांना ह्या कोरण्याचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्नाची गरज भासत होती अशा सर्वांपर्यंत देहूरोड विकास नगर किवळे येथील मुस्लीम समाजातील काही लोक अजीज भाई शेख यांच्या माध्यमातून विकास नगर किवळे येथील मुस्लीम समाजातील काही बांधव व तेथील मोहल्ला मधील बांध यांनी मिळून रमजान चा महिना चालू असताना देखील प्रत्येक गरजू अन्नावाचून उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत अजीज भाई शेख यांच्या पुढाकाराने त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या ६५ दिवसापासून ह्या गरजूंना दोन वेळचं जेवण दुपारी आणि सायंकाळी या दोन वेळचे जेवण हे देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर सर व मुस्लिम समाजातील धर्मगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व अन्नधान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या मुस्लिम समाजातील बांधवांनी कोणत्याही जातीचे राजकारण न करता किंवा कोणतीही जात पात यांनी न पहाता निस्वार्थ भावनेने केले आहे. तसेच या समाजातील लोकांमध्ये रमजानचा महिना चालू असताना  उपवासाच्या दिवसांमध्ये दिवस-रात्र स्वतः कष्ट घेऊन लोकांना अन्नधान्य पुरवले, काही असे लोक होते की ज्यांच्याकडे अन्नधान्य कोणी घेऊन जाऊ शकत नव्हते लोक काही देऊ शकत नव्हते अशा ७० लोकांना अन्नधान्याचे किट लोकांपर्यंत पोहोचवलं व हे सर्व चालू असताना पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी जून महिन्यामध्ये आता सर्व काही चालू झालेला आहे त्यामुळे आपण हे आता थांबावं असं त्यांना सूचना केली तेव्हा त्यांनी हे सर्व थांबून शेवट पोलिस स्टेशन मध्ये कोविड वाॅरीर्यस सनन्मान कार्यक्रम घेऊन केला यावेळी या सन्मानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देहूरोड ज्येष्ठ पत्रकार देवराम भेगडे हे होते तर प्रमुख पाहुणे पञकार अनिस शेख व संपादक विकास कडलक होते या वेळी मनीष कल्याणकर यांनी सर्वांचे मनोबल वाढवले व सर्वांनी असेच सतत अशा प्रसंगांमध्ये पुढे यावं म्हणून सर्वांना सन्मान या ठिकाणी या बांधवांचा केला जात आहे,या वेळी हे यांनी पुढाकार घेऊन मदथ करत होते असे सांगितले.

एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत
विकास नगर किवळे येथील सर्व मुस्लिम बांधव आणि तेथील मोहल्ला कमिटी यांच्यावतीने सुरुवात २७ मार्च ते ३१मे पर्यंत संपूर्ण ६५ दिवस एकूण पाकीट २३००० दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळचं जेवण तसेच अण्णांच्या पाकिटाचे किट वाटप ७०किट
अन्न वाटपाचे ठिकाण
विकास नगर ( शिर्के कंपनी )
आदर्श नगर (सिमेंट फॅक्टरी)
मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप
रेल्वे टेशन चे पलीकडे
शितळा नगर
आंबेडकर नगर
मामुर्डी मुंबई पुणे रोड देहूरोड ते तळेगाव पोलीस स्टेशन
देहू गावात गाथा मंदिरा पर्यंत ३५० लोकांना जेवण
ज्यांना ज्यांना वाटले
गरीब मजदूर निराधार व्यक्ती ज्यांना अन्न विस्तरा नाही निवारा नाही ब्रिज खाली रेल्वे स्टेशनला बसणारे असे व्यक्ती भुकेलेले जनावर अशांना जेवण वाटप केले.
सर्व टिम
मो आजीज रज्जाक शेख, डॉक्टर अशपाक बंगी,असलम इब्राहीम आत्तार,मेहबूब राजा भाई शेख, खलील चकोली, सुनील ननावरे, नागेश तेलगू ,भुसा शेख,शकूर मुल्‍ला, साद आत्तार, इरफान मुल्ला, आरमान दरोगा,अजीज भाई शेख,इस्माईल शेख,हरमीत लांबा,नरेंद्र चलवादी, आदी मिञ परिवार

Previous articleकर्तव्यम फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
Next articleकामगार कल्याण मंडळास अजमेरा येथील भूखंड देण्यास मंजूरी-भारती चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 2 =