पिंपरी,२९ मे २०२०( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाशी लढा देत असताना नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी काम करण्याचा हेतूने कर्तव्यम फाउंडेशच्या वतीने उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ३० मे २०२० रोजी मोशीतील रामजी विला-बारणे वस्ती देहूरस्ता, येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच कोरोना आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. यावेळी महापौर उषा ढोरे,भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे,माजी महापौर राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Home ताज्या बातम्या कर्तव्यम फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण...