Home ताज्या बातम्या विकासनगर,देहुगाव,चिंचोली देहुरोड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद

विकासनगर,देहुगाव,चिंचोली देहुरोड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद

0

पुणे,दि.२२मार्च२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर विकासनगर,देहुगाव,चिंचोलीदेहुरोड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळाला.देहुरोड एक लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो (देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. तसेच आयुध निर्माणीं देहूरोड येथे भारतीय मजदूर संघ संबध्दित भारतीय संरक्षण कामगार संघ, कामगार संगठन आहे,देहूरोड बाजार पेठ जुनी आहे,पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड मधुन जातो. संत तुकारामांच्या देहू गावाला जाण्यासाठी येथून रस्ता आहे, म्हणून गावाचेही नाव देहू रोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते.देहुरोड मध्ये स्वताः मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी देहुरोड पोलिसांन सोबत कर्फ्यु ला प्रतिसाद असला तरी देहुरोड,चिंचोली परिसर फिरुन पाहिला व सर्व माहिती घेतली

तसेच विकास नगर मधील मुख्य रस्ता हा ओस पडला होता,विकासनगर रिक्षासॅण्ड वरील परीसर शुकशुकाट होता,विकासनगर किवळे भागातील मुकाई चौक,भीमाशंकर नगर,दत्तनगर,श्रीनगर,साईनगर,मामुर्डी,शितळानगर,देहुगाव,विठ्ठल नगर,कृष्णनगर,आदर्श नगर,उत्तम नगर,माळवाडी,आंबेडकर नगर रोड,अब्बुशेठ रोड,मेन बाजार पेठ,वृदांवन चौक,सुभाष चौक,स्वामी विवेकानंद चौक, चिंचोली,किन्हई,परंडवाल चौक देहुगाव कमान अशा सर्व ठिकाणे रोज गर्दी असती पण आज (दि.२२ मार्च) शुकशुकाट पाहिला मिळाला,पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला देहुरोड करांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी पुणे पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच गस्तीवर होते.
शहरामधील रस्ते, चौक शांत असतानाही बहुतांश ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांमध्ये थांबलेले चित्र दिसत होते. सर्व देहुरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिस स्टेशनच्या बीट मार्शलबरोबरच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारीही आपापल्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. गावा मध्ये वस्त्यांमध्ये काही प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते.व सर्व ठिकाणी हा जनता कर्फ्यु ला प्रतिसाद दिला ज्यांचे पोलिस,पञकार आणि डाॅक्टर व त्यांचा स्टाफ यांच्या कार्याला परिश्रमाला सायं ५.०० वा सर्व नागरीक दारात येऊन टाळ्या आणि थाळी वाजवुन केंद्र सरकार, डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,अत्यावश्यक सेवा पुरविणारे यांचा सन्मान केला.

Previous articleपिंपरी चिंचवड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकार्ला परीसरात सर्वत्र कडकडीत बंद नागरीकांचा उस्फूर्त प्रतीसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 2 =