Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

104
0

पुणे,दि.२२मार्च२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येथे आयटी हब आणि एमआय डिसी श्रीमंत महानगर पालिका असलेले शहर अशी ओळख असलेलं पिंपरी चिंचवड शहर आज जनता कर्फ्यु मध्ये शांत झाले, कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं पिंपरी चिंचवडकरांनी पुढाकार घेत सकाळपासूनच बाहेर पडणं टाळले. शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आज संपुर्ण शांतता पसरली होती.नेहमी गजबजलेली महात्मा फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मात्र चिडीचूप आहे. यावरून एकूण पिंपरी चिंचवडची परिस्थितीचा अंदाज येतो.पिंपरी कॅम्प,भोसरी,पिंपरी मंडई,बाजारपेठ,काळेवाडी वाकड,हिंजवडी आयटी पार्क,तळवडे,चिखली,रावेत,विकासनगर ,मुकाई चौक,मोरया गोसावि परिसर,चाफेकर चौक,चिंचवड स्टेशन,आनंद नगर टुरीस्ट हाॅटेल चौक,निगडी भक्ती शक्ती परीसर,प्राधिकरण,पुनावळे,डांगे चौक,सांगवी,दापोडी,पिंपळे सौदागर,नाशिक फाटा या सारख्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणांवर आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी पुणे पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच गस्तीवर होते.
शहरामधील रस्ते, चौक शांत असतानाही बहुतांश ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांमध्ये थांबलेले चित्र दिसत होते. सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिस स्टेशनच्या बीट मार्शलबरोबरच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारीही आपापल्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. वस्त्यांमध्ये काही प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते.व सर्व ठिकाणी हा जनता कर्फ्यु ला प्रतिसाद दिला ज्यांचे पोलिस,पञकार आणि डाॅक्टर व त्यांचा स्टाफ यांच्या कार्याला परिश्रमाला सायं ५.०० वा सर्व नागरीक दारात येऊन टाळ्या आणि थाळी वाजवुन केंद्र सरकार, डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,अत्यावश्यक सेवा पुरविणारे यांचा सन्मान केला.

Previous articleलातूर जिल्ह्यात जनता कर्फ्युला प्रचंड प्रतिसाद
Next articleविकासनगर,देहुगाव,चिंचोली देहुरोड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + thirteen =