Home ताज्या बातम्या पिंपरी न्यायालयात 42 वर्षानी मिळाला न्याय ! आरोपींनी सुटकेचा निश्वास सोडला

पिंपरी न्यायालयात 42 वर्षानी मिळाला न्याय ! आरोपींनी सुटकेचा निश्वास सोडला

78
1

पिंपरी,दि.०६ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी न्यायालयात न्याय मिळण्यासाठी लागले 42 वर्षे,तक्रारदार दिनकर विठोबा कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती 19-3-1978 रोजी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास ते त्यांच्या शेतात कांद्याचा पीक पाहण्यासाठी गेले असता ,त्यांना त्यांच्या शेतात 3 ते 4 गायी पीक खाताना आढळून आल्या तक्रारदाराने ते पहिले असता त्या गाईना कोंडवड्यात घालण्यासाठी गावाकडे आणत होते ,त्यावेळी रघुनाथ रामभाऊ मगर सध्या वय 65 वर्षे त्यांना म्हणाले की ‘माझ्या गाई कुठे घेउन चालला आहे,त्या वेळेस आरोपींची तक्रारदार यास वाईट शिवीगाळ करून हाताबुक्यांनी व कुऱ्हाडीने मारहाण केली,भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 142/1978 दाखल झाला व आरोपींवर भा द वि कलम 324 ,504 नुसार गुन्हा दाखल केला,सदर चा गुन्हा मा न्यायाधीश दस्तगिर पठाण यांनी पाहिल्यानंतर आरोपी विरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आले ,आरोपीनी अॅड.अतिश लांडगे यांच्या मार्फत स्वतःहून न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करून केस चालवण्याची विनंती मा.न्यायाधीशांना केली,न्यायाधीश पठाण साहेबानी केस चालू करून घेतली,अॅड अतिश लांडगे यांनी तक्रारीतील सर्व मुद्यें खोडून काढत आरोपी च्या बाजूने युक्तिवाद केला व आरोपींची 42 वर्षे न्यायाची प्रतीक्षा करत निर्दोष मुक्तता करण्यात आली,आरोपींनी सुटकेचा निश्वास सोडला।सदर आरोपी सध्या सर्व वयोवृद्ध असून सिनिअर सिटीझन आहेत,ज्या दिवशी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली त्या दिवशी योगायोग न्यायधीश पठाण साहेबांचा 42 वा वाढदिवस होता।

Previous articleपिंपरी -चिंचवड वकिल संघटनेच्या वतीने पिंपरी न्यायालय ३१ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे ८ मार्चला आयोजन
Next articleजुन्या वादातुन विकासनगर मधील झिंगाट मिसळ येथे तरुणावर वार व लाथाबुक्याचा मार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + nineteen =