अमरावती,दि.9 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज अमरावती जिल्हा प्रतिनिधी-सतीश वानखडे):-
आसेगाव पूर्णा – वडार समाजाचे पन्नास शंभर लोक असणाऱ्या आसेगाव पूर्णा नगरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी भूमी म्हणून ओळखल्या जाते..
त्या मध्ये इतिहासाच्या नवीन पटलावर नवीन क्राती घडत असल्याचे चित्र बघायला मिळते.
दगड फोडून आपला संसार परिवार सांभाळणारे संजय शिंदे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन आपल्या छोट्याश्या घरा मध्ये साजरा करून जणू नवीन युगाची सुरुवात केली. त्यांनी गावामधील फुले,शाहू,आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांना आपल्या घरी बोलावून ज्ञानाच्या अथांग सागर असणाऱ्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आपल्या छोट्याश्या झोपडीत गावातील लोकांसोबत मोठ्या उत्सवात साजरा केला. आपल्या घरी बुद्ध वंदना घेऊन नवीन युगाचा प्रारंभ केला.. त्यांनी सांगितले की माझ्या मनात बाबासाहेन विषयी प्रेरणा नवचेतण्य निर्माण करणारे शिक्षक असते तर मी बुद्ध भिख्खू असतो. झालो नाही हे माझं दुर्भाग्य आहे . पण यापुढे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन माझ्या वडार समाजामधील प्रत्येक घरा घरामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करेल. अशी ग्वाही आणि विश्वास त्यांनी व्यक्त केला..
युगधंर, ज्ञानाच्या अथांग महासागर असणाऱ्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन वडार समाजाने साजरा करणे ही इतिहासातील प्रथम घटना असेल हेही तितकेच खरे यापुढे फुले,शाहू, आंबेडकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन हे वडार समाज आपल्या मोडक्या – तोडक्या झोपडी मधून करेल हा विश्वास त्यांनी दिलेल्या मुलाखती मधून बोलून दाखविला.