Home अकोला भांबेरी जि. प सर्कल चे वंचित चे प्रबळ दावेदार रमेश दारोकार

भांबेरी जि. प सर्कल चे वंचित चे प्रबळ दावेदार रमेश दारोकार

62
0

तेल्हारा,दि.9 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-तेल्हारा तालुक्यातील भांबेरी जिल्हा परिषद सर्कल भारिप चा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते भांबेरी जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जाती करिता राखीव आहे अशातच उमेदवारी करिता विविध नावांची चर्चा होताना दिसत आहे त्यातच विशेष नाव म्हणजे रमेश दारोकार या नावाची विशेष चर्चा होण्याचे कारण असे आहे की त्यांची कामगिरी तसेच पक्षाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे संपूर्ण महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती पहिले वंचितचे कार्यकर्ते लगातार दहा वर्ष अटकळी ग्रामपंचायतचे सरपंच होते व तसेच टाकळी सेवा सहकारी सोसायटीचे दहा वर्ष अध्यक्ष होते तसेच तेल्हारा खरेदी-विक्री संघाचे पाच वर्ष संचालक होते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे 13 वर्ष संचालक राहिले व दोन वर्षे सभापती होते त्यांचा राजकीय अनुभव चांगलाच आहे त्यांनी राजकीय क्षेत्रातून जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने केल्याने त्यांच्या नावाची भांबेरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये वंचित चे प्रबळ दावेदार म्हणून चर्चा होताना दिसत आहे शिवाय मनमिळावु व्यक्तिमत्व असल्यामुळे तसेच दांडगा जनसंपर्क कुठलाही पक्षपात न करता संकट समयी प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे व्यक्तिमत्व म्हणून वंचित बहुजन आघाडी रमेश दारोकार यांच्या नावाचा विचार करेल अशी आशा मतदार संघातून केली जात आहे जर वंचित बहुजन आघाडीने रमेश दारोकार यांना उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीला आपला गड राखण्यास सोपे जाईल असे मतदार संघातील अनेक दिग्गजांची मते आहेत . त्याचे कारण असे की रमेश दारोकार यांची खूप मोठी राजकीय बांधणी आहे .शिवाय सर्व जतीधर्मातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क शिवाय एक आज्ञाधारक व्यक्तिमत्व असल्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश सर आंखो पर मानणारे .
तरी जनसामान्यांतून भांबेरी जि.प.सर्कल मधून रमेश दारोकार यांना प्रथम पसंती मतदाराकडून देण्यात येत आहे तरी पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे .

Previous articleमला बोद्ध भिख्खू व्हायचे होते पण होता आले नाही महापरिनिर्वाण दिनी व्यक्त केली भावना…! संजय शिंदे वडार समाजाचे नेते
Next articleवायसीएमएच मधील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदी पारदर्शक नाही-आमदार अण्णा बनसोडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 19 =