Home ताज्या बातम्या अभिजीत बिचुकलेनं घेतला थेट सलमान खानसोबत पंगा ; पञातुन दिला हा इशारा

अभिजीत बिचुकलेनं घेतला थेट सलमान खानसोबत पंगा ; पञातुन दिला हा इशारा

204
0

सातारा,दि.3 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मराठी बीग बाॅस फेम अभिजीत बिचुकले चर्चेत राहणारं व्यक्तीमत्व आहे. अनेक उलटसुलट वक्तव्य करुन बिचुकले नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय ठरण्याची चिन्ह आहेत. कारण त्याने थेट भाईजान सलमान खानसोबत पंगा घेतला आहे.
बिचुकलेने पत्र लिहून सलमान खानला इशारा दिला आहे. सलभान भाई तुझ्या दबंग 3 चित्रपटातील एका गितामध्ये तू साधुसंतांना नाचताना दाखवलं आहेस. हे दृष्य चित्रपटातून ताबडतोब काढून टाक नाहीतर मी स्वत: पुढाकार घेऊन हिंदुच्या भावना दुखावल्याप्रकरणी तुझा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा बिचुकले याने दिला आहे.
सलमानभाई तुला माहिती असेल की बिग बॉस मराठी सिजन नंबर 2 मध्ये मी स्पर्धक असताना त्या ठीकाणी माझे उपवास, व्रत, वैकल्य, अतिशय धार्मिकतेने करत होतो. मी माझ्या देव देवतांना व माझे गुरु श्री.श्री. बाबा बिचुकले तसेच साधुसंतांचा प्रचंड आदर करतो. मी हिंदू रितीरिवाजच नाही तर रोजेही करतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे माझ्या भावनांची दखल घेत तू हे दृष्य काढून टाक, असा सल्ला किंवा समच, सूचना मी तुला देत आहे, असंही बिचुकले म्हणाला आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकले याने दिलेला हा इशारा सलमान खान किती गांभीर्याने घेतो आणि चित्रपटातील ते दृष्ट काढून टाकतो का? हे बघावं लागेल.

Previous articleयेलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध धंदे बंद करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल
Next articleचैत्यभूमी, शिवाजी पार्कवर ड्रोन भिरभिरणार; महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 2 =