Home ताज्या बातम्या येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध धंदे बंद करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात...

येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध धंदे बंद करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल

62
0

येलवाडी,दि.30 नोव्हेबंर 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-खेड तालुक्यातील तिर्थ क्षेञ येलवाडी ग्राम पंचायत हाद्दी मध्ये राजेरोस पणे अवैध दारु,हातभट्टी,मटका,झुगार,सॉरटचालु आहेत,हे अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करा. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची कन्या संत भागीरथी माता ह्या येलवाडी गावच्या असल्यामुळे येलवाडी गावास तिर्थ क्षेत्राचा क दर्जा प्राप्त आहे.
त्यामुळे राज्यभरातुन हजारो वारकरी,भाविक भक्त,शाळा,महाविद्यालयाच्या सहली,संत साहीत्याचे अभ्यासक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे गावची ओळख बदलत चालली आहे. दारु धंदे झुगार मटक्याचे गाव म्हणुन आता तिर्थक्षेत्र दर्जा असलेल्या गावाची ओळख होत आहे.तिर्थक्षेत्र येलवाडी गाव चाकण-तळेगाव MIDC च्या मध्यावरती गाव असल्यामुळे राज्य भरातुन नोकरी,कामा निमित्त लोक गावात जागा घेऊन राहणे पसंत करतात, परंतु अशा अवैध दारु धंदे मटका,झुगार,गांजा,सॉरट,दारु,हातभट्टी मुळे अनेक तरुण व्यसना धिन होत आहेत. अनेक तरुणांचे प्रपंच (कुटुंब) उध्वस्त होत आहे.
त्यामुळे कायदेशीर कार्यवाही करुण अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्यात यावे. अन्यथा २१ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल.असा इशारा
यलवाडी गावच्या ग्रामपंचायत च्या सदस्याच्या शिष्ट मंडळानी दिला.29 नोव्हेंबरे 2019 रोजी पञ दिले

या मध्ये,सौ.उर्मिला बा. गायकवाड – (सदस्य),सौ.रेखा सो. बात्रे – (सदस्य),मा.सागर गाडे – (सदस्य),मा.तानाजी गाडे – (सदस्य), मा.प्रदिप गायकवाड – (सदस्य) मध्ये असुन पुढील कार्यवाहीसाठी 1)मा. जिल्हाधिकारी साहेब, विधानभवन,पुणे, 2)मा.तहसिलदार तथा तालुका कार्यकरी दंडाधिकारी , खेड
3) मा. उपविभागिय अधिकारी साहेब
4) आमली पदार्थ विरोधी पथक,पिंपरी-चिंचवड, आयुक्तालय.
5) मा. पोलिस निरीक्षक महाळुंगे चौकी ,पिंपरी-चिंचवड विभाग
6) अध्यक्ष संत तुकाराम महाराज देवस्थान तिर्थक्षेत्र देहुगाव
7) अध्यक्ष संत भागीरथी माता देवस्थान तिर्थक्षेत्र येलवाडी
8) मा. निरीक्षक साहेब राज्यउत्पादक शुल्क,
तळेगाव,9)मा.जिल्हा अधिक्षक पुणे,या सर्वाना भेटुन पञ देण्यात आले,लवकरच कार्यवाही करतील अशी अपेक्षा ह्या शिष्ट मंडळाने केली आहे.

Previous articleमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार म्हणुन ‘सामना’चे संपादक पद उद्धव ठाकरेंनी सोडले
Next articleअभिजीत बिचुकलेनं घेतला थेट सलमान खानसोबत पंगा ; पञातुन दिला हा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + 17 =