Home ताज्या बातम्या चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर ड्रोन भिरभिरणार; महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज

चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर ड्रोन भिरभिरणार; महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज

60
0

मुंबई,दि.04 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून दहा हजार अनुयायांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था, पाणी, आरोग्य सुविधा तैनात ठेवण्यात येणार आहेत. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत दोन ड्रोन चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर भिरभिरणार आहेत. शिवाय चैत्यभूमीलगत संपूर्ण चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसहित बोटीही तैनात ठेवण्यात येणार आहेत.

चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर हिंदू कॉलनीतील निवासस्थान ‘राजगृह’, दादर रेल्के स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, पालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते 5 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क मैदान येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.

पालिकेच्या सात शाळांमध्ये व्यवस्था

चैत्यभूमीवर येणार्‍या अनुयायांना आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवार्‍याची सोय मिळावी म्हणून शिवाजी पार्क परिसरातील पालिकेच्या सात शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्यक सुविधा देणार असल्याचे सह आयुक्त नरेंद्र बरडे यांनी स्पष्ट केले.

अशा सुविधा उपलब्ध

चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा.
एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा
शिवाजी पार्क मैदान व परिसरात 18 फिरती शौचालये.
380 पिण्याच्या पाण्याचे नळ, रांगेतील नागरिकांसाठी 16 टँकर्स
संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा तैनात
दादर पश्चिम रेल्वे स्थानक आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर पूर्व स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण-माहिती कक्ष
अनुयायांना मार्गदर्शनाकरिता 100 फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुगे.
मोबाईल चार्जिंगसाठी शिवाजी पार्क मैदानातील मंडपात 300 पॉइंट.
फायबरची तात्पुरती स्नानगृहे, तात्पुरती आणि फिरती शौचालये.
अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा- सुभाष देसाई

चैत्यभूमी येथे येणार्‍या अनुयायांना सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासन व महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून त्याप्रमाणे नियोजन करावे तसेच अनुयायांना देण्यात येणार्‍या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेकण्यासाठी योग्य कार्यकाही करण्याच्या सूचना देसाई यांनी याकेळी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत देसाई यांनी राज्य शासन, पोलीस, महापालिका, बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली. चैत्यभूमी, अशोक स्तंभ, भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 6 डिसेंबर रोजी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

इंदू मिल स्मारकाची छायाचित्रे चैत्यभूमी परिसरात लावा

आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेने इंदू मिल येथील स्मारकाचे छायाचित्र चैत्यभूमी परिसरात लावावे तसेच पाकसाची शक्यता गृहीत धरून आपत्कालीन क्यकस्था योग्यरितीने करावी, अशी सूचना केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या अनुयायांसाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष सूचना दिल्या आहेत.

राज्यभरातून येणार्‍या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे निवासासाठी मंडप टाकण्यात येत आहे. तसेच येथे एलईडी स्क्रीन, भोजन मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी 16 टँकर क 380 नळांची व्यवस्था, 18 मोबाईल शौचालय व 120 फायबर शौचालये, 260 स्नानगृह, परिसरात विद्युत दिव्यांची सोय, समुद्रकिनार्‍याकर 48 जीवरक्षकांची नेमणूक, मंडपामध्ये 300 मोबाईल चार्जिंग पॉइंट आदी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क क चैत्यभूमी परिसरात तीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून 11 रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. पोलीस दलाच्या वतीने परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच 100 सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
एसटी, बेस्ट आणि रेल्वेच्या जादा गाड्या
एसटी महामंडळाच्या वतीने पनवेल-दादर, अलिबाग-पनवेल-दादर, भिवंडी-दादर-मुंबई या मार्गावर दिवसभरात शंभर फेर्‍या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या जादा बसेस
बेस्ट प्रशासनाने गुरुवार, 5 डिसेंबरला रात्री 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बसमार्ग क्रमांक 241, 351 आणि 354 वर जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी दादर स्थानक (प.) ते शिवाजी पार्क मैदान व चैत्यभूमीला जाण्याकरिता दादर फेरी या नावाने अतिरिक्त बसफेर्‍या चालविण्यात येणार आहेत. गुरुवारपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत या फेर्‍या धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या 12 स्पेशल ट्रेन मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर अप दिशेला कुर्ला-दादर स्पेशल लोकल मध्यरात्री 12.45 वा., कल्याण-दादर मध्यरात्री 1 वाजता, ठाणे-दादर मध्यरात्री 2.10 वा. सुटणार आहे. डाऊन दिशेला दादर-ठाणे मध्यरात्री 1.15 वा., दादर-कल्याण मध्यरात्री 2.25 वा. आणि दादर-कुर्ला पहाटे 3 वा. चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर अप दिशेला वाशी-कुर्ला मध्यरात्री 1.30 वा., पनवेल- कुर्ला मध्यरात्री 1.40 वा. आणि वाशी-कुर्ला पहाटे 3.10 वाजता चालविण्यात येणार आहे. डाऊन दिशेला कुर्ला-वाशी मध्यरात्री 2.30 वा., कुर्ला-पनवेल रा. 3 वा., कुर्ला-वाशी पहाटे 4 वा. सुटणार आहे.

Previous articleअभिजीत बिचुकलेनं घेतला थेट सलमान खानसोबत पंगा ; पञातुन दिला हा इशारा
Next articleहैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =