Home ताज्या बातम्या ‘प्रथम ती’ महिला संमेलन शिवसेना वतीने पिंपरी-चिंचवड शहरात महिला मेळाव्याचे आयोजन…

‘प्रथम ती’ महिला संमेलन शिवसेना वतीने पिंपरी-चिंचवड शहरात महिला मेळाव्याचे आयोजन…

0

पिंपरी,दि.२३ सप्टेंबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने ‘प्रथम ती’ संकल्पना घेऊन महिलांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आहे महिलांचे पंच शक्ती संकल्प यामध्ये शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य, आणि स्वावलंबन या विषयांवर प्रमुख वक्त्या आमदार डॉक्टर मनिषाताई कायंदे तसेच वीणा भागवत, नगरसेविका प्रवीणा मोरस्कर या मार्गदर्शन करणार आहे. मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनास ॲड. आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर व पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती शिवसेना वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार, संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, शिवसेनेचे गजानन चिंचवडे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × five =