Home ताज्या बातम्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार)...

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार) निवडणूक लढविणार

85
0

पिंपरी,दि. 23 सप्टेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – जनहित लोकशाही पार्टी यांच्या वतीने सोमवारी 23 सप्टेंबर 2019 पिंपरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पार्टीच्या वतीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव रामचंद्र आल्हाट, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार), भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक विश्वास गजरमल आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषदादा चौधरी यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद साळवी, महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब पाटोळे, जनहित कामगार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज माने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब तिरकुंडे, युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आसिफ शेख, निकिता मुख्यदल आदी उपस्थित होते.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर झालेल्या नितीश (नताशा) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई, या सर्व थोर समाजसुधारक माता-पित्यांना मी प्रथम अभिवादन करते. घटनेतील दुरुस्तीमुळे आम्हा एलजीबीटींना 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे या प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात स्वतंत्र दर्जा मिळाला. या घटना दुरुस्तीसाठी ज्ञात, अज्ञातपणे पाठबळ देणा-या सर्वांचे मी प्रथम अभिनंदन करते व आभार मानते. 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे एलजीबीटींना (एल – लेस्बियन, जी – गे, बी – बाय सेक्स्यूयल, टी – ट्रान्स जेंडर) हक्क मिळाले. परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही. अजूनही आम्हाला आमचे न्याय, हक्क मिळविण्यासाठी झगडावेच लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेत खाते उघडणे, नवीन वाहन घेणे, घर घेणे, पासबूक, कर्ज मिळविणे, चरितार्थासाठी उद्योग व्यवसाय सुरु करणे यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाच्या विकासाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचल्या नाहीत. देशभर एलजीबीटींची संख्या लाखामध्ये आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आमच्या प्रतिनिधी म्हणून खासदार लक्ष्मी त्रिपाठी संसदेत लढा उभारत आहेत. दिशा शेख, गौरी सावंत, सचिन वाघोडे, शायना पाटील, पंकज बोकील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करणार आहे. मी स्वत: नितीश (नताशा) लोखंडे हॉटेल मॅनेजमेंटची पदवीधर आहे. माझे सहकारी निकिता मुख्यदल ही देखील व्दीपदवीधर आहे. सचिन वाघोडे-पदवीधर, पंकज बोकील-अभियंता आहेत. व्यावसायिक पदवी मिळवून देखील आमच्यासारखे लाखो एलजीबीटी रोजगारापासून वंचित आहेत. चौका-चौकात भीक मागणे, छोट्या मोठ्या ऑकेस्ट्रामध्ये नाचगाण्याचे काम करणे व सेक्स वर्कर म्हणून पैसा मिळविणे. आयुष्यभर समाजाचे टक्के, टोणपे सोसत उतारवयात, अपंगत्व आल्यानंतर आम्हाला भेडसावणा-या सामाजिक व आरोग्याच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. यातून तृतीय पंथीयांची सुटका व्हावी म्हणून एलजीबीटींचे प्रश्न सक्षमपणे समाजापुढे मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता आम्हाला सहानुभूती नको तर समाज दर्जा मिळावा यासाठी आमचा हा लढा आहे. जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव रामचंद्र आल्हाट ग
यांनी पत्रकार परिषदेत दिलेली
महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मातंग व इतर बहुजन समाजाची अत्यंत प्रबळ संघटनात्मक शक्ती, मोठ्या असलेल्या आणि देशाच्या राजकीय क्षितिजावर नव्यान उदय होत असलेला नवी राजकीय पक्ष म्हणजे “जनहित लोकशाही पार्टी “. जनहित लोकशाही पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वच जिल्यांमध्ये कार्यरत झेत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश, ठाणे. नवी मुंबई, मुंबई अशा अनेक विभागात अधिक प्रमाणावर वाटचाल करत आहे. पक्षाचे आतापर्यंतचे काम पाहता येणाऱ्या 2019 विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पक्षाची मजबूत ताकद निर्माण केली आहे. जनहित लोकशाही पक्षांमध्ये, सर्व जाती धर्मातील एस.सी. एस टी . ओ . बी . सी . ओपन . अल्पसंख्याक आदि घटकातील मान्यवर नेते प्राध्यान्याने पदाधिकारी होत आहेत . महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित घटक मागासवर्गीय , दलित , पदलित , सुशिक्षित बेरोजगार , कष्टकरी , शेतकरी , कामगार , मजदूर , दुर्बल घटक आदि जनहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून राजकीय मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करत आहोत . स्वातंत्र्यानंतर ७० ते ७२ वर्ष होऊन गेली , प्रमुख सत्तेमध्ये राहिलेल्या प्रस्थापित पक्षांनी या सर्व घटकांना योग्य न्याय दिला नाही . त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही . परिणामी या सर्व वंचित घटकांना, राजकीय मुख्य प्रवाहात येऊन आपला राजकीय लाभ जेवढ्या प्रमणात झाला पाहिजे तेवढा तो झाला नाही .
शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही कामगारांना काम नाही , उद्योगधंदे बंद पडत आहेत . कामगारांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाही मागासवर्गीय महामंडळे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीही ठोस भूमिका घेत नाही . शिक्षणाचे बाजारीकरण सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता महागाईने आहे. महागाईने कळस गाठला आहे. उद्योगधंदे मेटाकुटीला येऊन बंद पडत आहेत. कामगाराची उपासमारीची वेळ आली आहे . मागासवर्गीयांवर अन्याय – अत्याचार होत आहेत. आत्तापर्यंतच्या अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली परंतु उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते , त्यांना आणले नाही . सध्या लोकांची मागणी आहे की , ईव्हीएम बंद करुन , बॅलेट पेपरवर सर्व निवडणूका इथून पुढे लढवाव्यात ज्यामुळे पारदर्शकपणा निर्माण होईल . लोकांच्या भावना फार तिव्र आहेत . असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत . – सध्या या सत्ताधारी युती सह आघाडी व इतर प्रस्थापितांना धडकी भरविणारा पक्ष म्हणून “ जनहित लोकशाही पार्टी ” महाराष्ट्रात वाढत आहे . पक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की , शेतकरी , कामगार , दुर्बल घटक , मागासवर्गीय अशा अनेक घटकांसाठी प्रभावि काम करणाऱ्या संघटना देखील या पक्षासोबत येत आहेत . अशा अनेक संघटनांचे पदाधिकारी भेटत असताना असे जाणवले की , स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष लोटली तर या घटकांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत आणि म्हणून या सर्व घटकांना यावेळी जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने एक मोठी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी , पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोकराव आल्हाट व पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय विनोदराव मोरे तसेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषदादा चौधरी व पक्षाचे इतर सर्व नेते यांनी सकारात्मक भूमिका याबद्दल घेतलेली आहे . येणाऱ्या विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील २८८ मतदारसंघात पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवून राज्यात पक्षाची ताकद दाखवून देतील असा ठाम निर्धार माननीय अध्यक्ष व नेते यांनी व्यक्त केला आहे . याविषयी पक्षाची विस्तृत भूमिका मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणारच आहोत . धन्यवाद !
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहमीच वंचीत राहिलेला बहूजन समाज हा अनेक सामाजिक व राजकीय विकासापासून समाजाला सामाजिक प्रवाहात आणणे , व त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करणे , याकरिता जनहित लोकशाही पार्टीने येणा – या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेच्या २८८ जागावर आपले उमेदवार करण्याचा निर्णय घेतला आहे . राज्यातील सर्वच्या सर्व जागावर जनहित लोकशाही पार्टी ही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहेत . गेल्या चार वर्षापासून वंचीत समाजाच्या अनेक प्रश्नाकरीता जनहित लोकशाही पार्टी या घटकांच्या खांदयाला खांदा लावून अनेक प्रश्नांना वाचा फोडली व अन्यायाच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे . कुठल्याही प्रस्थापित पक्षांना भीक न घातला हा पक्ष आपली भुमिका ठामपणे मांडत आहे . मागील चार वर्षात सतत जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या भावना जाणून व त्यांना सामाजिक व राजकीय प्रबोधन करीत या पक्षांने राजकीय व सामाजिक घडामोडीचा बारकाईने अभ्यास केला आहे . हे सर्व सामाजिक कार्य करीत असताना अनेक सामाजिक नेते व कार्यकर्त्यांनी पार्टीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे चार वर्षापूर्वी लावलेले हे झाड आता बळकट झाले असून ते मागासवर्गीयाकरिता निवडणूकीच्या रिंगणात उतरुन प्रस्तावित पक्षांशी दोन हात करण्यास तयार झाले आहे .

Previous article‘प्रथम ती’ महिला संमेलन शिवसेना वतीने पिंपरी-चिंचवड शहरात महिला मेळाव्याचे आयोजन…
Next articleपिंपरी चिंचवड मध्ये भाजपा महायुतीची सत्ता येईल.या वर्षी जास्त आमदार भाजपचे असतील-खा.गिरीष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − 10 =