Home ताज्या बातम्या शेखर ओव्हाळ यांच शक्ती प्रदर्शन ठरले सर्वान पेक्षा सरस,पिंपरी चिंचवड भोसरी तिन्ही...

शेखर ओव्हाळ यांच शक्ती प्रदर्शन ठरले सर्वान पेक्षा सरस,पिंपरी चिंचवड भोसरी तिन्ही मतदार संघ राष्र्टवादीला

129
0

पिंपरी,दि.22सप्टेबंर2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आयोजित जाहीर मेळावा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी माननीय अजितदादा पवार (माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच अमोल मितकरी (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ),पार्थ अजित पवार शेख सुभानआले मंहम्मद अली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मेळाव्याचे संयोजन संजोग वाघेरे पाटील (शहराध्यक्ष माझी महापौर)सर्व आजी माजी नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यावतीने करण्यात आले.
ढोलताशाच्या गजरात शेखर ओव्हाळ यांचे शक्तिप्रदर्शन झाले हजारो लोक या रॅलीत सामील झाले एकच फलक झळकत होता उमेदवार हाच पाहिजे त्यावर अजित दादांचा फोटो शरद पवार साहेबांचा फोटो पार्थ पवार चा फोटो आणि शेखर ओव्हाळचा फोटो आणि होय आम्हाला हाच उमेदवार पाहिजे जनतेने शेखर ओव्हाळ यांना आमदार मान्य केला आहे यावरून दिसून येते
या मेळाव्यामध्ये पिंपरी विधानसभेकडे इच्छुक असणारे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं, तसेच सुलक्षणा शीलवंत धर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं व डॉ. उत्कर्ष शिंदे यांची अनुपस्थिती होती, चिंचवड विधानसभा मधुन मोरेश्वर भोंडवे,नाना काटे,भाऊसाहेब भोईर,भोसरी विधानसभे मधुन,दत्ता काका साने विलास लांडे आदी नी शक्ती प्रदर्शन केले.घोषणांनी परिसर दणाणु गेला होता तेव्हा अजित दादानी स्वतः माईक हातात घेत घोषणा देणार्‍याला आता तिकीट देणार नाही असा दम दिला व पुर्ववत कार्यक्रम सुरु केला
यावेळी संजोग वाघेरे शहराध्यक्ष भाजपकाळात भ्रष्टाचार वाढला आहे, पिंपरी-चिंचवडला दिशा देण्याचे काम फक्त अजितदादांनी केले,दादा असताना बंद पाण्याची पाईप लाईन चालू करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला सत्ता द्या 100 दिवसात प्रश्न सोडवू असे म्हणणारे ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप सरकारने सांगितले अशी कोणती प्रश्न महापालिकेने वेळोवेळी सोडवले फक्त आश्वासने दिली आणि शासन मूलभूत प्रश्‍न वाढले आहेत असा आरोप संजोग वाघेरे यांनी केला, पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड राष्र्टवादी जिकुंन येईल

शेख सुभान अली मोहम्मद राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी बोलताना शिवाजी महाराजांचे दाखले देत शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार देशात आल खरं पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची पायमल्ली केली आहे, पिंपरी-चिंचवडचा विकासकामे पाहिल्यावर असे वाटते अजितदादा मराठवाड्यात हिंगोली मध्ये का जन्मले नाही किती छान झाले असते जर दादा मराठवाडा जन्मले असते. फडणवीस सरकारने जातीय दंगली वाढवल्या महापुरुषांच्या नावाने फक्त घोषणा केल्या आश्वासने दिली. शिव स्मारक उभारू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारू पण कोणतेही स्मारक उभारू शकले नाही फक्त घोषणाच,महाराष्र्टातल्या मुसलमानांचा मोगलाशी संबंध नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध होता, शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड हे मुस्लीम होते आमचे मुस्लिम समाजातील नेते म्हणतात की ताजमहाल,बाबरी मशीद बांधा, अगर हमने बांधा होता तो आज हम पंचर का दुकान चलाते, या सर्व गोष्टींचा मोहम्मद अली यांनी उलगडा करत या महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्र फिरत असताना अजितदादांच शिवाजी महाराजांच्या विचांराच सरकार स्थापन करु शकतात आणि ते करणार, असे वक्तव्य करत वक्तव्य करत इस देश का गद्दार भी तू है असे भाजपा मोदीवर टीका केली. महाराजांचे मावळे आहोत आम्ही जाणार नाहीत पुन्हा एकदा एकत्र येऊया आणि शिवरायांचे मावळे सत्तेत आणुयात.
अमोल मिटकरी राष्ट्रवादी पार्टी अशी पार्टी आहे तिच्यामध्ये महिला युवक वर्ग जास्त आहे
एवढ्या जर कार्यकर्ता कुठल्या पक्षात असेल तर फक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आहे,सर्व नेते शब्द फिरवतात पण अजीत दादा कधी शब्द फिरवत नाही,
जे सोडून गेले त्यांचा इतिहास लिहिला जात नाही जे सोबत आहेत त्यांचा इतिहास लिहिला जातो असे सांगत अमोल मिटकरी यांनी या महाजनादेश यात्रेला फडणवीस सरकारला लोकांनी काळे झेंडे दाखवले अंडे फेकले कडकनाथ कोंबड्या फेकल्या असेही सरकारचे वास्तव सांगत दाखला देत त्याचा उलगडा करत हे सरकार दळभद्री सरकार आहे, इंद्रायणीच्या नमामि च्या नावाखाली मोठा घोटाळा भ्रष्टाचार केला आहे, भाजप वाढवणार्‍या खडसेंना बाजूला का सारलं, छत्रपतींची पगडी मोदींच्या डोक्यात घातली पण मोदींच्या भाजपाने उदयनराजेंना मात्र बाजूला सारलं ह्यापेक्षा स्वराज्याचा अपमान काय छत्रपती शिवरायांना आपण मोदीच्या गळ्यात डोक्यावर ठेवली पण मोदी छत्रपती आहे का मोदी जर मला स्वामी छत्रपतींचा मावळा मावळ्यांची टोपी छत्रपतींना घालत आहोत तर किती छान वाटलं असतं राजे इथे होते राजे तिथे होते शहाणा शहा यांच्या डोक्यावर यांच्या गळ्यात कवड्यांची माळ घातली शिवाजी महाराजांनी कवड्यांची माळ फक्त तानाजी मालुसरे यांच्या गळ्यात घातले म्हणजे तानाजी मालुसरे एक सेवक होता शहा एक गुन्हेगार आहेत तडीपार गुंड आहे असे बोलत अमित शहा वरती टीकास्त्र केले व महाराष्ट्रात येऊन म्हणतात की शरद पवारांनी काय केलं तर शरद पवारांनी या भारतामध्ये अनेक एअरपोर्ट बनवले तुमच्या गुजरात मध्ये बस स्टँड पण तसे नसतील असे प्रत्युत्तर दिले. एका गाडीवाल्याला लुंगी घालून गाडी चालवली म्हणून त्यांनी ठरवलं या मोदी सरकारने नानाप्रकारचे दंड लागू केले तर लुंगी घातली म्हणून जर त्या गाडीवाल्याला दंड ठोठावला तर अमोल मिटकरी यांनी मात्र गडकरींचे स्तुती केली गडकरी यांच्या सारखा भाजपामध्ये नेता नाही,फडणवीस यांनी त्यामुळे गडकरी यांचे अधिकार सगळे स्वतः कडे ठेवले आहे आम्ही सांगू तेच करायचं, शिवसेना-भाजप तजररी काही असले तरी सडकून टीका केली जाते हे सरकार गड-किल्ले भाड्यावर भाडे तत्वावर देणा त्यांना जीआर रद्द करा म्हणून विरोधी पक्षांनी निवेदन दिले होते पण शेवट लागू होईपर्यंत रद्द केला नाही त्यामुळे या सरकारला हे गड किल्ले भाडेतत्वावर देऊन त्याची नासाडी करायचे आहे हे दिसून येते यांना सरकारी ऐतिहासिक वास्तूचे जतन करायचं नाही हे दिसून येतं, गोपीनाथ मुंडे जर महाराष्ट्रात असते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते चहा शरीराला घातक पण चहावाला मात्र देशाला घातक आहे भाजपवाले भेकड आहेत, लोकांची कामे केली असती तर लोकांना भेटायचं होत दादा सुप्रियाताई सुळे, पवार साहेब हे लोकांच्या गावोगावी संपूर्ण महाराष्ट्र परत लोकांसोबत बोलत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत फोटो काढत आहेत का कारण त्यांनी लोकांची कामे केली, म्हणून त्यांना भीती नाही पण मात्र यापूर्वी सरकारने कोणतेही काम केले नाही म्हणून तेरा फुटाच्या गाडीवरती बसून यांनी यात्रा काढली.
अजित दादा पवार बोलताना म्हणाले 1991रोजी मला खासदार बनवून नेतृत्व करण्याची संधी दिली तेव्हापासून या पिंपरी-चिंचवड शहराचे माझे जवळच नाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शिरूर लोकसभेमध्ये यश आले अमोल कोल्हे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला खासदार मिळाला पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असेल तर निराश होऊन जायचं नाही,पुन्हा कामाला लागायचं पिंपरी,चिंचवड,भोसरी तिने जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत, काँग्रेसला सोबत घेऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्याशी व्यवस्थित राहून आपल्याला काम करायचे आहे, मागे जे घडलं ते घडलं पण आता विधानसभेला माञ पडू द्यायचा नाही तर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा दोन दिवसात मुंबईमधून उमेदवारांची यादी जाहीर होईल,यादी जाहीर झाले की कार्यकर्त्यांनी कोणीही रुसून जायचं नाही पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं पिंपरी चिंचवड स्पाईन रोड काय बनवला होता त्याची काय अवस्था आहे या शहरांमध्ये या पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये भाजपचे सरकार असून या सरकारला साधे रोडचे खड्डे बुजवत येत नाही, पिंपरी-चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न वाढत आहे पाण्याचा साठा धरणांमध्ये पूर्ण असतानाही पिंपरी-चिंचवडकरांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे सर्व टीडीआर बिल्डरांना मिळावा यासाठी सरकार पुढाकार घेत आहे का, शास्ती कर माफ करणार होते,फक्त घोषणाच करत राहिला.पिंपरी-चिंचवड भोसरी या तीन उमेदवार निवडून त्या सहा महिन्याच्या आत शास्ती कर माफ केला नाही तर पवारांचे अवलाद सांगणार नाही,पाण्याचे प्रश्‍न निर्माण झाला आहे, छोटे लघु उद्योगांची व्यवस्था काय झाली, टेल्को ची अवस्था काय झाली इथल्या एमआयडीसीतील कंपन्यांचे अवस्था काय झाली बेकारी वाढत आहे खाजगीकरण होत आहे, त्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात वाढत आहे कचरा समस्या भरमसाठ वाढली आहे कचरा प्रश्न मार्गी लावता येत नाही, 16000 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले, सरकारने पाच वर्षे फसवले आहे फक्त भाजपच्या नावाने करोडो रुपये कुठून जमा होतात याचा आढावा या सरकारने आम्हाला द्यावा, पोलिस आयुक्त दोन महिन्यांमध्ये रिटायर होणार होते तर त्यांची बदली कशी झाली याचे उत्तर सरकारने द्यावा, खैरलांजी घडली होती तेव्हा मी स्वतः काही कार्यकर्त्यांसोबत काही गैरप्रकार घडू नये म्हणून कार्यकर्त्यांना सावरत होतो आपण पाहिलं या पाच वर्षांमध्ये ह्या भाजपा सरकारच्या काळांमध्ये या सनातनी आरएसएसच्या सरकारच्या काळांमध्ये फक्त आणि फक्त जातीय दंगली वाढले आहेत हा पोलिस प्रशासनाच्या सर्वेमध्ये पोलिसांकडून निवडणुक आयोगाकडे की,फडणवीस सरकारच्या काळांमध्ये जास्त जातीय दंगे वाढले आहेत.मोदी सरकारचा पिंपरी-चिंचवड शहराची काही संबंध नाही या सरकारने जातीवादी व्यवस्था निर्माण करत उच्चवर्णीयांनी मोक्याच्या जागा काबीज केले आहेत, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भोसरी हा मतदारसंघ आहे या भोसरी मतदारसंघांमध्ये मागील दोन वेळा अपक्ष आमदार निवडून येत आहे म्हणुन भोसरी विधानसभेमध्ये अपक्ष उभे राहयच गौडबंगाल काय आहे माझे लक्ष आहे मा.आमदार विलास लांडे यांना टोला दिला मलाही कळतं मी 1991 पासून या शहराशी माझं वास्तव्य आहे त्यामुळे अनेक इच्छुक भोसरी मधून अपक्ष लढण्याची इच्छा व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे सरकार पुढे आणू या मी इथेच आहे आणि मी या जनतेसोबत आहे पिंपरी-चिंचवडकरांचा सोबत आहे नरेंद्र मोदी महाराष्ट्रात चालवणार नाही तर त्यांना केंद्राचे सत्ताकेंद्र चालवायचा असतो महाराष्ट्र चालवण्यासाठी महाराष्ट्राचे नेते असतात ते कोणाही पक्षाचा असो राष्ट्रवादी काँग्रेस सेना-भाजप हे महाराष्ट्राचे पदाधिकारीच नेते महाराष्ट्राच्या कार्यभार सांभाळत असतात पालकमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचा पी.एम.आर.डीए काढून पुण्याला नेलं का पिंपरी-चिंचवडमध्ये बघवत नव्हतं या शहराशी त्यांना काही आपुलकीचा भाव आहे नद्यांची अवस्था आज काय झालेले आहे याबाबत तर नुसत्या सरकारने घोषणा दिल्या आहेत कर्जमाफी मात्र कुठेच नाही, टोलमुक्त महाराष्ट्राचा काय झालं, शेतकऱ्यांचा हमीभावाचा काय झालं, मोफत शिक्षणाचा कायदा शिवाजी स्मारकाचं काय झालं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा काय झालं अशा अनेक प्रश्न उपस्थित करत अजित दादांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले भारत सरकार हे कर्जबाजारी झाले असून रस्ते विकास बांधकाम सचिवालय कडून आदेश आला आहे की रस्ते बांधण्यात येणार नाहीत, नोटबंदीचा फटका आता जाणवू लागला आहे कारण हा नोटबंदीचा निर्णय सरकारने घेऊन देशाला धोक्यात टाकले, अजित पवार मरेपर्यंत पिंपरी-चिंचवडला विसरणार नाही, राजे गेले, सरसेनापती गेले केले अजून जाणारे जातील माञ आम्ही डगमगणार नाही कारण आमच्या सोबत सर्व कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही नवं नेतृत्व निर्माण करत पुन्हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करू, चंद्रकांत पाठलांना कोल्हापूरची ओढ आहे आणि राहणार त्यामुळे पुण्यासाठी काही करू शकत नाही,बाळा भेगडे राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना प्रश्न उत्तरे पुरता अधिकार आहे, पिंपरी चिंचवड पुण्याचा एक पण मंत्रिमंडळात नेता नाही त्यामुळे पिंपरी-चिंचवड पुण्याचे प्रश्न सोडवणे ह्या कुणाच्याही हातात नाही आता मोदी सरकारच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागतील असं वाटलं होतं पण अनेक प्रश्न उपस्थित झाले,फडणवीस सरकारने दोन मेगा भरती केली आता तिसर्‍या टप्प्यातील ही मेगा भरती होणार आहे बघुयात कोण कोण जातील त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे खुले राहणार नाहीत सर्व दरवाजे त्यांना परत बंद होतील सत्ता आल्यावर एकालाही पक्षात घेतले जाणार नाही,शिवसेना-भाजपा युती होणारच कारण आता उलट झालंय बाळासाहेब ठाकरे असायचे तर कमळाबाई ला झुकवायचे पण आता कमळाबाई शिवसेनेला झुकवते. त्यामुळे युती ही होणारच उमेदवार कधी जाहीर करणार असा अनेकांचा प्रश्न मनामध्ये उपस्थित असेल तर भाजप-सेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी सर्व आढावा घेऊन सर्व स्थिती पूर्वक उमेदवार घोषित करेल,मागील लोकसभेच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी यांच्यामध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे या सरकारला फायदा झाला त्यामुळे यावेळेस सेकुलर मतं ही कुठेही जाणार नाहीत राष्ट्रवादी सोबत राहतील आणि खरा काम करणारा सच्चा नेता निवडून देतील,आपण मत दिले पाहिजे आपलं मत वाया जाऊ देता कामा नये आणि ह्या वेळेस मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करा असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांना अजितदादांनी दिला सर्व प्रश्नांचे उत्तर सोडवायचा असेल तर राष्ट्रवादीला साथ द्या सर्वांनी स्वतःला उमेदवार असल्यासारखं प्रत्येकाने मतदारसंघांमध्ये काम करा आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पिंपरी-चिंचवड शहरांमधून निवडून देऊ या असा निर्धार करूया मनात असे पदाधिकाऱ्यांना संबोधले.
युवा नेते शेखर ओव्हाळ यांनी आभार सर्वांचे आभार मानले.

Previous articleमहाराष्ट्र राज्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान पार पडणार
Next article‘प्रथम ती’ महिला संमेलन शिवसेना वतीने पिंपरी-चिंचवड शहरात महिला मेळाव्याचे आयोजन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 7 =