Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

74
0

बीड,दि.१८सप्टेंबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर शरद पवारांनी राष्ट्रवादीची पहिली यादी केली जाहीर.
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी बीडचे उमेदवार जाहीर केल्याने आता बीड जिल्ह्यात रंगतदार लढती होणार आहेत.अन्य पक्षाच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास नात्यागोत्यातच लढती होण्याची चिन्हं आहेत.बीडमधील रंगतदार लढती
बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
केज – संगिता ठोंबरे (भाजप) VS नमिता मुंदडा (राष्ट्रवादी)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे.
2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार
गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )
बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज – संगिता ठोंबरे (भाजप)
परळी – पंकजा मुंडे (भाजप)

Previous articleडाॅ.संतोष तावरेनी केले केज विधान सभेत वंचीत बहुजन आघाडीच्या सत्तासंपादन महारॅलीचे स्वागत
Next articleपिंपरी विधानसभेत स्थानिक उमेदवार न दिल्यास वंचित ला बसणार फटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 4 =