Home ताज्या बातम्या पिंपरी विधानसभेत स्थानिक उमेदवार न दिल्यास वंचित ला बसणार फटका

पिंपरी विधानसभेत स्थानिक उमेदवार न दिल्यास वंचित ला बसणार फटका

94
0

पिंपरी,दि.२० सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात लोकप्रिय असा पर्यायी पक्ष लोकांना समोर उभा राहिला आहे, त्यातच पिंपरी-चिंचवड शहरांमधील पिंपरी हा मतदारसंघ लोकांचा चर्चेचा विषय बनला आहे संबंध महाराष्ट्राचे लक्ष पिंपरी विधानसभेकडे आहे कारण पिंपरी हा राखीव मतदारसंघ असून अनेक दिग्गज नेते अनेक पक्षातुन उभे राहणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी सत्ते पासून वंचित असणाऱ्या सर्व समूहांना सोबत घेऊन सत्ता मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि ज्या मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवार आहेत तिथे माञ नक्कीच फायदा मिळणार आहे कारण स्थानिक उमेदवार हा वर्षानुवर्ष स्वतःच्या मतदारसंघात राहत असतो,लोकांशी तिथल्या समस्याशी त्याची नाळ जुळलेली असते. आयात उमेदवार फक्त निवडणुकीपुरते मतदारसंघात येतात फ्लेक्स बाजी करतात आणि चर्चेत येतात पण निवडून मात्र येत नाही याची चर्चा पिंपरी मतदारसंघातील आंबेडकरी अनुयायी मध्ये आह,नेते फक्त नेत्यांचाच विचार करत आहेत पण स्थानिक मतदारांचे काय असे वातावरण पिंपरी विधानसभेत निर्माण झाले आहे, त्यातच पिंपरी विधानसभेत स्थानिक उमेदवार असताना अन्य विधानसभेतील उमेदवार पिंपरी मधून का असा सवालही मतदारसंघातून ऐकण्यात येत आहे.पिंपरी मतदारसंघ हा राखीव असून या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांचे मतदान हे वंचित ला मिळणारच पण स्थानिक उमेदवार असेल तर अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे नेते मतदारांचा विचार करणार की फक्त नेतेमंडळींच्या विचार करणार आता हा प्रश्न निर्माण होताना दिसत आह, आंबेडकर चळवळ म्हटलं एकनिष्ठ जिवंतपणाचे लक्षण जर वंचित ला पिंपरी मतदारसंघातून उमेदवार,पिंपरी मतदारसंघातला मिळाला तर पिंपरीतील जनतेला न्याय मिळाला असे होईल पिंपरी मतदारसंघांमध्ये मतदारांशी चर्चा केल्यानंतर वंचितला पिंपरी विधानसभा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे पण उमेदवार मात्र स्थानिक असावा तो आयात नसावा कारण पिंपरी मतदारसंघात राहणाऱ्या उमेदवारास पिंपरीच्या दुःख माहित आहे ते आयात उमेदवारांना कळु शकणार नाही आणि ते मतदारांना दाद देऊ शकणार नाही त्यामुळे वंचितला पिंपरीतील स्थानिक उमेदवार मिळावा अशी अपेक्षा असून येत्या काळात वंचित मतदारांच्या मनाचा विचार करून स्थानिक उमेदवार देतातकी आयात उमेदवार देतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल

Previous articleराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित
Next articleमहाराष्ट्र राज्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान पार पडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 1 =