Home ताज्या बातम्या आमदार कोल्हेंची चिंता वाढवली विखे पाटलांच्या मेहुण्याने

आमदार कोल्हेंची चिंता वाढवली विखे पाटलांच्या मेहुण्याने

142
0

मुंबई,दि.04 सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, युतीच्या जागावाटपात सुद्धा हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार कोल्हे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र आता कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हे यांची डोकेदुखी वाढली आहे.

गोदावरी दुध संघाचे अध्यक्षपद परजणे यांच्याकडे असून ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्यांनी ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विखेंना मानणारा वर्ग आणि नातेगोत्यातील लोकं परजणे यांच्या पाठीशी उभा रहू शकतात. त्यातच परजणे यांचा सुद्धा मतदारसंघात चांगली पकड असल्याने, त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार कोल्हेंची चिंता वाढवणारा आहे.

परजणे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विखे भाजपमध्ये असून त्यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पद सुद्धा आहे. त्यातच जिल्ह्यातील कुणाला उमेदवारी द्यायची ही जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे नेमकी पक्षाकडे कुणाची बाजू मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Previous articleपोस्टा’च्या बेफिकीरीचा नवोदित वकील युवतीस फटका
Next articleमुलगी पाहायला आले अन् लग्न लावून नवरीला घेऊन गेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + 18 =