Home ताज्या बातम्या पोस्टा’च्या बेफिकीरीचा नवोदित वकील युवतीस फटका

पोस्टा’च्या बेफिकीरीचा नवोदित वकील युवतीस फटका

115
0

पिंपरी,दि.04 सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-सतीश कदम):-  पिंपरीतील कोमल सातुर्डेकर ही विद्यार्थिनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिने वकिलीची सनद घेण्यासाठी मुंबई येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे 16 ऑगस्ट रोजी सर्व कागदपत्रांसह रीतसर अर्ज दिला होता. 20 ऑगस्ट रोजी सनद स्पीड पोस्टने पाठवली. मात्र; पोस्टाने पत्ता सापडत नाही म्हणून ती परत पाठवली. 3 सप्टेंबरला याबाबत पिंपरी गावात पोस्टमनची जबाबदारी सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी असे पत्र आले होते. पण माझा गोंधळ झाल्याने मी परत पाठवले असे उत्तर दिले.

याबाबत पिंपरीच्या पोस्ट ऑफिस प्रमुखांशी संपर्क साधला असता तुम्ही तक्रार द्या. मी ती पोस्टाच्या सुप्रिटेंडंटला पाठवते असे सांगितले. मात्र, या प्रकारामुळे 4 सप्टेंबरला मुंबईत जाऊन सनद आणण्याची वेळ कोमल हिच्यावर आली. सनद मिळाल्यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 1 सप्टेंबरला संपल्याने आता सहा महिने पुढच्या परीक्षेची वाट पाहण्याशिवाय तिच्यापुढे उपाय राहिला नाही. पोस्टाच्या या बेफिकीरीची शिक्षा नवोदित वकील युवतीस भोगावी लागली आहे.

Previous articleविविध विकास कामांसाठी ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
Next articleआमदार कोल्हेंची चिंता वाढवली विखे पाटलांच्या मेहुण्याने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =